चिमणराव गुंड्याभाऊ
१९७९

विनोदी
३५ मिमी/रंगीत/११५मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी९०४९७/१६-१०-१९७९./यू

निर्मिती संस्था :आदित्यचित
दिग्दर्शक :विनय धुमाळ
कथा :चिं.वि.जोशी
पटकथा :विजय तेंडूलकर
संवाद :विजय तेंडूलकर
संगीत :दत्ता डावजेकर
छायालेखन :शशिकांत सागवेकर, भरत नेरकर
संकलक :प्रल्हाद सायवी, दिलीप धुमाळ
गीतलेखन :शंकर वैद्य
कला :पुरुषोत्तम बेर्डे, प्रकाश मुणगेकर, नारायण मिस्त्री
रंगभूषा :प्रकाश चाचड, ए. बाबू
वेषभूषा :दिगंबर खटावकर, सुरेश ड्रेसवाला, राणी सबनीस
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :हिंदमाता फोटो स्टुडिओे
गीत मुद्रण :रेशिओ जेम्स, मंगेश देसाई, एशियन स्टुडिओज
ध्वनिमुद्रक :विल्यम हंट, मधुकर घाग
निर्मिती स्थळ :शांताकिरण स्टुडिओ, कोल्हापूर, ज्योती स्टुडिओ, मुंबई
रसायन शाळा :शंभु नाईक, राजकमल लॅबोरेटरीज
सूत्रधार :निवेदन: पु.ल.देशपांडे
कलाकार :दिलीप प्रभावळकर, बाळ कर्वे, भारती आचरेकर, सुलभा कोरान्ने, अरूणा पुरोहित, निरज माणिकर, गणेश मतकरी, दिलीप कोल्हटकर, मोहन गोखले, अशोक सराफ, विजू खोटे, दत्ता भट, व. पु. काळे, डॉ. श्रीराम लागू, लालन सारंग, दीपा श्रीराम, सुषमा तेंडुलकर, दया डोंगरे, प्रदिप वेलणकर, वीणा देव
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, श्वेता किरण, सचिन, वैशाली, शुभदा, शिल्पा, दिलीप प्रभावळकर
गीते :१) स्वच्छ मोकळी हवा त्यात गोड गारवा मोद दाटतो मनि क्षणोक्षणी नवा नवा, २) कसे तुम्ही अवचित राया आला जिवाचा गुलमोहर हा फुलला
कथासूत्र :चिमणराव जोग आणि गुंड्याभाऊ दांडेकर.सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सज्ज झालेली सरळमार्गी दुक्कल.एकाजवळ बुद्धी तर दुसऱ्याजवळ शक्ती.ते बॉयस्काउटचे प्रयोग सुरु करतात.पण त्यामुळे चिमणरावला घर सोडावे लागते.म्हशीसकट नवीन जागी जायचे म्हणजे समस्या.तिथे अनेक घोटाळे होतात.समाजकार्यासाठी एक जुनाट मोटारही वापरतात.एकदा परोपकारापोटी चिमणराव सर्कशीत वाघही होतो.पण तिथे त्याचे खरे रूप उघडकीस येते.सगळाच गोंधळ माजतो.शेवटी गुंड्याभाऊ तात्पर्य काढतो.चिमणरावनं चिमणरावच राहावं.
विशेष :महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे, यांचा या चित्रपटासाठी खास सहयोग. चित्रपट निवेदन त्यांनी केले होते. १९५३ साली ‘‘देवबाप्पा’’ चित्रपटाबरोबर दाखवल्या गेलेल्या व चि. वि. जोशी, यांच्या कथेवर निर्माण केलेल्या ‘‘नवे बिर्‍याड’’ या लघुपटामध्येही त्यांनीच निवेदन केले होते. जवळजवळ पाव शतकानंतर योगायोग जुळुन आला कि पुन्हा एकदा कथा चिं. वि.जोशींची व चित्रपटाचे निवेदन पु. ल. देशपांडे यांचे.

सामायिक करा :

अधिक माहिती