तिखट मिरची घाटावरची
१९७९

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी४५६८/५-१०-१९७९./ए

निर्मिती संस्था :अनंत आर्टस् प्रॉडक्शन्स
निर्माता :अनंतराव टाले, अपर्णा देवी
दिग्दर्शक :अरूण कर्नाटकी
कथा :अनंतराव टाले
पटकथा :मा. दा. देवकाते
संवाद :मा. दा. देवकाते
संगीत :श्रीधर
छायालेखन :मनोहर आचार्य
संकलक :रामदास बनावलीकर
गीतलेखन :मा. दा. देवकाते
कला :अरुण कर्नाटकी
रंगभूषा :विजय पांघम, बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :कुसुम शर्मा, रघुनाथ देसाई
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :अमृत पांचाळ व चिमासाहेब घोरपड
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा व शांतकिरण स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :अपर्णादेवी, सुधीर दळवी, सुनील रेगे, प्रदीप पवार, शंकर भाके, आशा पाटील, छाया देशमुख, ब्रम्हे, भारती, मधुबाला, सत्येंद्र, मनोहर, बाबूराव माने, मा. मनोज टाले व अनंतराव टाले
गीते :१) फांदी नका ओढू, २) एक गावरान मासा गावलाय गं, ३) माझ्या काळजान घेतलाय धसका, ४) कसं नांदायला येऊ मी बाई, ५) वाजत गाजत सुखस्वप्नांची वरात, ६) बाटली डब्बा घेतेविकते, ७) फांदीफांदी हलवित बसला होऊन वारा खुळा, ८) संधूसाधू हा मवाली चोर जनतासेवक नाही हा चोर
कथासूत्र :पो.इन्स्पे.रेगेवर स्मगलिंग,तरुणींचा अनैतिक व्यापार वगैरे गोष्टींच्या बंदोबस्ताची कामगिरी असते. रेगेची बहीण चांगुणाचे नगरपिता रामभाऊशी लग्न होते.लग्नानंतर तिला कळते की या सर्व कृष्णकृत्यांच्या टोळीचा रामभाऊ म्होरक्या आहे.ती हे भावाला फोन करून सांगते,ते रामभाऊ ऐकतो व तिचा निकाल लावायचे ठरवतो.ती मरते,पण मरण्यापूर्वी एका मुलीला जन्म देते.ती झोपडपट्टीत वाढत असते.पुढे रेगे डी.एस.पी.होतो तर त्याचा मुलगा इन्स्पेक्टर.ते रामभाऊला अटक करतात.मृत्युशय्येवर असताना रामभाऊला पश्चाताप झालेला असतो.तो रेगेना म्हणतो,’मी आयुष्यात फक्त पैसाच मिळवला.आता माझ्या मुलीचे म्हणजे तुमच्या भाचीचे पालनकर्ते व्हा.’

सामायिक करा :

अधिक माहिती