लागेबांधे
१९७९

कौटुंबिक
३५ मिमी/रंगीत/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी९०४९२/२५-९-१९७९./यू

निर्मिती संस्था :भावना प्रॉडक्शन
निर्माता :गोविंद कुलकर्णी
दिग्दर्शक :गोविंद कुलकर्णी
कथा :गोविंद कुलकर्णी
पटकथा :गोविंद कुलकर्णी, वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :ॠषिराज
छायालेखन :सुरेश उदाळे
संकलक :एन्. एस्. वैद्य
गीतलेखन :वसंत सबनिस, मुरलीधर गोडे
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :रमेश बी. नोहाटे
वेषभूषा :पी. खटावकर
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ शुभदत्त, चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :डी.ओ.भन्साळी
ध्वनिमुद्रक :बाबा लिंगनुरकर
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉडर कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :शांताकीरण स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :फेमस सिने लॅबोरेटरीज्
कलाकार :रवींद्र महाजनी, चंद्रकांत, उत्तरा, कामिनी भाटिया, कुलदीप पवार, दिनानाथ टाकळकर, लीला गांधी, गुलाब मोकाशी, आशा पाटील, आय्. बलदेव, अस्वले गुरुजी आणि जयश्री गडकर
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, शैलेद्र सिंग
गीते :१) धुंद हिरवा मोहर गहिरा, २) हा उकाडा सोसवेना फार चोळी काचते, ३) चल राया धुंद काया, ४) चांदनी, नाच ग पोरी तू नाच ग नाच आली ग होली आली ग होली हो
कथासूत्र :सखाराम सुतारची मुलगी राधा आणि भाऊ लखा.आबासाहेब इनामदार गब्बर श्रीमंत.त्यांचा मुलगा बाजीराव वाह्यात,उधळ्या,उनाड.राधावर बाजीरावची नजर पडते आणि संधी साधून तो तिच्यावर बलात्कार करतो.दिवस गेलेल्या राधेला पंढरपूरला पोहोचवून यायची आज्ञा सखाराम लखाला देतो. तिथे त्याची व मैनाची भेट होते.राधा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी लखाचा काटा काढायला ती आपल्या दरोडेखोर मित्राला सांगते.पण लखापुढे त्याचं काही चालत नाही.भडकलेला लखा बाजीरावचा मुडदा पाडतो आणि राधाला इनामदारांच्या वाड्यात झोपडी बांधून राहायला सांगतो.आणि जगाला ओरडून सांगतो की राधाच्या उदरात इनामदारांचा नातू वाढतो आहे.आणखी शोभा नको म्हणून इनामदार राधेचा सून म्हणून स्वीकार करतात.

सामायिक करा :

अधिक माहिती