उषा
१९३५

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१०९६९ फूट/१२२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १४७८३/ ४-७-३५

निर्मिती संस्था :शालिनी सिनेटोन
दिग्दर्शक :बाबूराव पेंटर
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :के.व्ही.माचवे
कला :बाबूराव पेंटर
ध्वनिमुद्रक :बी.जी.देसाई
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :उषा मंत्री, रत्नप्रभा, वासुदेव काळे, दिनकर दुधाळे, सुशिलादेवी, गोविंदराव टेंबे, करमरकर, विनय काळे
गीते :१) सुखकर वसंत सरसावला, २) हा घननीळ हरी गोजिरा, ३) शांत झाले सारे विश्व बाळे गे, ४) ब्रह्मदेव सूत नारद मुनीवर, ५) वासुदेव हरी नारायण तो, ६) जयति जय कैलास राणा, ७) यदुनंदना मुकुंदा रुसलासी, ८) नमामि तात् शंकरम्, ९) कार्या शुभारंभ झाला, १०) शशीराया दावोनि वदना, ११) अनिवार नच कोणी.
कथासूत्र :द्वापारयुगातील गोष्ट.शोणितपूरचा राजा बाणासूर हा महान शिवभक्त.श्री शंकराच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्याने वैष्णवांचा अनन्वित छळ सुरु केला.श्रीकृष्णाने युक्तीने बाणासुराची कन्या उषा व आपला नातू अनिरुद्ध यांचा विवाह घडवून आणून 'शिव' आणि 'विष्णू' ही एकाच विराट शक्तीची दोन निरनिराळी रूपे आहेत हे पटवून दिले.
विशेष :कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला बोलपट मराठी बरोबरच उषा हिन्दीत ही काढण्यांत आला होता. उषा बोलपटाच्या बुकलेटवर मुखपृष्ठासाठी बाबूरावांनी उषा मंत्री या बोलपटाच्या नायिकेचे एक अप्रतिम चित्र तयार केले होते व त्या मुळे उषाच्या बुकलेटला एक प्रकारचा रिचनेस आला होता. आता उषाचे हे बुकलेट ‘‘कलेक्टर्स आयटेम” मानले जाते.

सामायिक करा :

उषा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती