निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :के.नारायण काळे
पटकथा :के.नारायण काळे
संवाद :के.नारायण काळे
संगीत :मास्टर कृष्णराव
छायालेखन :व्ही. अवधूत
गीतलेखन :के.नारायण काळे
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :बालगंधर्व, रत्नप्रभा, के.नारायण काळे, मा. छोटू, वासंती, वसंत देसाई, बुवासाहेब, रजनी, भाऊ केळकर
गीते :१) भाव तोचि देव, २) जया म्हणती नीचवर्ण, ३) प्रभुची कृती ही सारी, ४) सत्वर पाव ग मला, ५) प्रीती नेणे जाती लघुगुरु, ६) श्रीहरि दीनदयाळ तूं, ७) कुणा माव कळणार हरीची, ८) आवडीने भावे हरिनाम घेसी, ९) कठिण गमें अती, १०) संत भलते याती असो, ११) भ्रांत चित्त शांत झाले, १२) जीवा तळमळसी पुत्रासाठी, १३) तारिसी तू निजरिपू, १४) अहो स्वामी श्रेष्ठा समर्था, १५) विरति सकल मतभेद-ऐक्य सौख्य दे.
कथासूत्र :संत एकनाथांचा हरिजनोद्धार हा चित्रपटाचा विषय.स्वतः ब्राम्हण असणाऱ्या एकनाथांनी राणू महाराची जाई ही मुलगी मुलीच्या मायेनं वाढवली.जातीभेद तीव्रपणे मानले जात होते अशा त्या काळात हरिपंडीत या त्यांच्या मुलाने ह्या कृत्याला विरोध केला.त्यामुळे श्राद्धाच्या दिवशीही सर्व ब्राम्हणांनी एकनाथांकडे श्राद्धविधीसाठी नकार दिला.तेव्हा एकनाथांनी ते सर्व जेवण महारमांगांना दिले.हे पाहून गावातल्या सर्व ब्राम्हणांनी एकनाथांना महाराघरी जेवण्याचे आवाहन केले.आपल्याला जेवायला बोलावण्यास आलेल्या जाईच्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला आणि तिच्या हातचे जेवण घेतले.अशा रीतीने समानता धर्माची शिकवण त्यांनी आचरणातून दिली.
विशेष :संत एकनाथाच्या भूमिकेत बालगंधर्व प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकले. बालगंधर्व-प्रभात-शांतारामबापू हे सारे मराठी रसिक मनास भुरळ पाडणारे होते. या बोलपटाचे नांव ‘‘महात्मा’’ ठेवण्यांत आले होते. पण ब्रिटीश सरकारला ‘महात्मा’ या नावाचे वावडे होते. संत एकनाथांचा हरिजनोद्धार ह्या ऐतिहासिक घटनेवर भर देणा-या कथेला राजकीय व सामाजिक महत्व होते. बोलपटांतील कांही प्रसंग व ‘महात्मा’ ह्या नावालाच मुंबईच्या सेन्सॉरने आक्षेप घेतला व ते प्रसंग व बोलपटाचे ‘‘महात्मा’’ हे नाव ‘‘धर्मात्मा’’ असे बदलल्यावरच तो प्रकाशित करण्यास परवानगी देण्यांत आली.
हा बोलपट मराठी बरोबरच हिन्दीतही काढण्यांत आला होता.