विलासी ईश्वर
१९३५

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२५४८ फूट/१२० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १५१७४/४-१०-३५

निर्मिती संस्था :कोल्हापूर सिनेटोन
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :मामा वरेरकर
पटकथा :र.शं. जुन्नरकर
संगीत :गुंडोपंत वालावलकर
छायालेखन :व्ही.बी.जोशी
संकलक :र.शं. जुन्नरकर
कला :शिंदे
ध्वनिमुद्रक :टेलर
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :कोल्हापूर सिनेटोन, कोल्हापूर
कलाकार :शोभना समर्थ, इंदिरा वाडकर, मा. विनायक, बाबूराव पेंढारकर, बाळ ढवळे, गुंडोपंत वालावलकर, मनोहर माईणकर
गीते :१) ही एक आस मनीं उरली, Puff Puff the engine said, २) चल मारू भरारी, ३) जै जै विलास गुरू, ४) नाथा निराशा न साहे, ५) दिसावा परावा जिवाचा सखा, ६) पुष्पावीण येई वास, ७) आली सदनी सखी इंदिरा.
कथासूत्र :विलास ह्या जहागीरदारपुत्राचे शमा नावाच्या एका नर्तिकेवर प्रेम बसते आणि तो तिला लग्न करण्याचं वचनही देतो.पण कळतं की,शमाला मूल होणार आहे,तेव्हा तो हादरतो आणि तिला सोडून देतो.शमाला मुलगा होतो.ती त्याचे नाव नंदू ठेवते आणि त्याला स्वतःच्या हिमतीवर वाढवते.विलास ईश्वर नाव धारण करतो आणि इंदिरा नावाच्या राजकन्येशी लग्न करू पाहतो.पण इंदिरेचे शमाचा भाऊ संजीव याच्यावर प्रेम असते.त्यामुळे ईश्वर का संजीव असा तिच्यापुढे प्रश्न पडतो.पण शेवटी प्रेमाचाच विजय होतो आणि ती संजीवचा स्वीकार करते.इकडे नंदू बिनबापाचा म्हणून वाढतो आणि अनाथ मुलांचे प्रतिनिधित्व करतो.
विशेष :मराठी चित्रपटातील पहिले आंग्लभाषी गाणे. शोभना समर्थ या अभिनेत्रीचे रूपेरी पडद्यावरील प्रथम दर्शन. मा. विनायक यांचा पहिला दिग्दर्शीत केलेला बोलपट. मराठीतील पहिला पूर्ण लांबीचा (१२० मिनिटे) सामाजिक बोलपट. चित्रपटाची कथा अनौरस संतती या विषयावर आधारलेली होती. त्यातील ‘‘डान्स ऑफ हार्ट’’ ह्या नृत्याची रंगदार योजना अत्यंत रसिकतेने सादर केली होती.
मराठी बरोबरच ‘‘विलासी ईश्वर’’ हिन्दीतून ‘‘निगाहे-ए-नफरत’’ (Orphans Of The Society) नावाने प्रदर्शित केला होता.

सामायिक करा :

विलासी ईश्वर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती