निर्मिती संस्था :भट-बेडेकर प्रॉडक्शन
दिग्दर्शक :वा. ना. भट, विश्राम बेडेकर
कथा :राम गणेश गडकरी
पटकथा :विश्राम बेडेकर
संवाद :आचार्य प्र.के.अत्रे
छायालेखन :नाना पोंक्षे, मराठे
कला :बाळकोबा गोखले
ध्वनिमुद्रक :कुलकर्णी, लोणकर
निर्मिती स्थळ :सांगली
कलाकार :दामुआण्णा मालवणकर, बळवंतराव पेठे, शंकरराव मुजुमदार, विठू, बाळकोबा गोखले
कथासूत्र :नाना,बाळक्या,त्यांचे मित्र बाळकराम आणि कंपनी यातर्फे तिंबूनाना यांची मुलगी ठकू हिच्यासाठी वरसंशोधन करतात.' ठकी'म्हणजे साक्षात कोळशातील रत्न!तिचे लग्न जमवता जमवता सर्वांच्याच नाकात दम येतो.
विशेष :भारतीय चित्रपट इतिहासातील व मराठी भाषेतील पहिला गीतविरहित चित्रपट. राम गणेश गडकर्यांचे मानसपुत्र ‘‘तिंबुनाना” आणि ‘‘बाळकराम’’ प्रथमच पडद्यावर दाखल झाले. ठकीचें लग्न पडद्यावर ५३ मिनीटांत आटपत असे.