उमज पडेल तर
१९६०

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/१११मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी ३१२००/२८-११-१९६०./ यू

निर्मिती संस्था :चित्र साधना
निर्माता :ना.बा.कामत
दिग्दर्शक :दिनकर द. पाटील
पटकथा :दिनकर द. पाटील
संवाद :दिनकर द. पाटील
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :अरविंद लाड, डब्ल्यू.आय्. सी. ए., विश्वास साळुंके, डब्ल्यू. आय. सी. ए.
संकलक :रामराव घाटके
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :के. द. महाजनी
रंगभूषा :सीताराम ह. मराठे
केशभूषा :कुसुम
वेषभूषा :राम सदरे
नृत्य दिगदर्शक :नटवरलाल
स्थिरचित्रण :कामत फोटो फ्लॅश
गीत मुद्रण :मिनू कात्रक
ध्वनिमुद्रक :सुरेंद्रनाथ पेडणेकर
निर्मिती स्थळ :रूंगठा सिने कॉर्पोरेशन प्रा. लि., मुंबई, (सेंट्रल स्टुडिओ)
रसायन शाळा :सिटी सिने लॅबोरेटरी, मुंबई
कलाकार :चित्रा, रमेश देव, दादा साळवी, शांता जोग, जीवनकला, आत्माराम भेंडे, शरद तळवळकर, दत्तोपंत आंग्रे, सुषमा, गुलाब कोरगांवकर, तुकाराम बापू, विठाबाई, केळुसकर, बबन प्रभु आणि दुर्गा खोटे व बैठकीच्या गाण्यात शुभा खोटे
पार्श्वगायक :आशा भोसले, सुधीर फडके, ललिता फडके, माणिक वर्मा, उषा अत्रे
गीते :१) वळती वाट चढता घाट, २) नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी, ३) घननीळा लडिवाळा, ४) ऐन वयांत आलेली, ५) मिटुन घेतले नेत्र तरी ते चित्र मनाला दिसें, ६) नसे राऊळी वा नसे मंदिरी
कथासूत्र :सासूविषयी कमलचे मत चांगले नसते.त्यामुळे लग्न करून सासूला वठणीवर आणायचे असे ती मनाशी ठरवते.आणि श्रीधरशी लग्न करते.श्रीधरने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतलेला असतो आणि तो वर्कशॉप काढतो.त्यामुळे गोरे वकिलांच्या राहणीशी तुलना करता कमलला आपला संसार दरिद्री वाटू लागतो.दिवाळीच्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम करण्यासाठी श्रीधर सासरचा पाहुणचार सोडून गेला असे गोरे सांगतात. कमल श्रीधरला तमाशा सोडण्यास सांगते.श्रीधर मानत नाही.कमलची सासू तिला अपसमजाने नवऱ्याशी भांडण्यापेक्षा त्याच्याशी सहकार्य करण्यातच हित आहे असे सांगून पटवते.सासूला वठणीवर आणायला निघालेली कमल खजील होते.त्यांचा संसार सुखाने सुरु होतो.

सामायिक करा :

अधिक माहिती