वनकेसरी
१९६०

जंगलपट
३५मिमी/कृष्णधवल/८८मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी ३११४१/१६-११-१९६०./ यू

निर्मिती संस्था :मिना चित्र
निर्माता :मनोहर मुरकुट्टे
दिग्दर्शक :विश्वनाथ कामत
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :पी. सावळाराम
संगीत :शंकर कुलकर्णी
छायालेखन :गणपत शिंदे
संकलक :जी. जी. पाटील
गीतलेखन :पी. सावळाराम
रंगभूषा :घनश्याम पाटील
वेषभूषा :रघुनाथ
नृत्य दिगदर्शक :डी. बाबूलाल
गीत मुद्रण :मिनू कात्रक
ध्वनिमुद्रक :एम. एदलजी
कलाकार :चंद्रकांत, रत्न, मा. विठ्ठल, मा. परशुराम, किरण, नान् संझगिरी, प्रभाकर मुजुमदार, नलिनी, भारती, शंकरराव भोसले, मनू कुलकर्णी, रमेश देव, दामुअण्णा मालवणकर, सुमित्रा हत्तीण
पार्श्वगायक :मधुबाला चावला, परशुराम, उषा रेगे
गीते :१) प्रेमनगरच्या नवनारी, २) अनुपमा रूपमोहिनी, ३) बघुनि मला वनातला, ४) ये ये ये ना

कथासूत्र :शिकारीची फार आवड असलेले प्रोफेसर आपली मुलगी रत्ना,निकट मित्र जयसिंगराव आणि हिम्मतराव यांच्यासह शिकारीला जातात. रमेशला रत्ना फार आवडत असते.त्यामुळे तोही त्यांच्याबरोबर जातो.हे लोक जंगलातील अद्भुत वनस्पती नेण्यास आले असावेत या समजुतीने जंगली लोक त्यांना पकडतात.तेव्हा वनकेसरी त्यांना सोडवतो. रत्ना वनकेसरीवर भाळते.रमेशला आणि जंगलाच्या राजकन्येला ही गोष्ट आवडत नाही.ती या लोकांना पकडून बळी देण्याची आज्ञा करते.पण प्रोफेसरांचा मेव्हणा भोलाराम आणि बिजली त्यांना वाचवतात.
विशेष :मराठी भाषेतला पहिला जंगलपट.

सामायिक करा :

वनकेसरी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती