लग्नाला जातों मी
१९६०

विनोदी
३५मिमी/कृष्णधवल/१०९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी३१५८०/२७-१२-१९६०/ यू

निर्मिती संस्था :सागर चित्र
निर्माता :दत्ता कुलकर्णी
दिग्दर्शक :दत्ता कुलकर्णी
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :बाळ बापट
संकलक :अनंत धर्माधिाकरी
गीतलेखन :मधुसूदन कालेलकर
कला :केशव महाजनी
रंगभूषा :नाना जोगळेकर
वेषभूषा :फ्रान्सीस फर्नांडीस
स्थिरचित्रण :पी. विनोदरॉय
गीत मुद्रण :बी.एन. शर्मा
रसायन :सिल्वरटाऊन लॅबोरेटरी, परळ
ध्वनिमुद्रक :मधुकर देशपांडे, सावे
निर्मिती स्थळ :प्रकाश स्टुडिओ, शरद स्टुडिओ, अंधेरी
कलाकार :जयश्री गडकर, सूर्यकांत, नीलम, दामुआण्णा मालवणकर, शरद तळवलकर, वैशंपायन, सुरेश फाळके, आणि राजा गोसावी
पार्श्वगायक :आशा भोसले, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर
गीते :१) नसून आहे असून नाहीं मला भूतळी कुणी न पाही, २) रात चांदणी गंध चंदनी आज लोचनी हवास तूं, ३) रात आज धुंदली प्रीत आज रंगली, ४) नकोस छेडूं आज प्रिया नकोस छेडूं, ५) आज डोळ्यात उभी लाज, ६) डोळे माझे त्यांत तुझे रूप कसे, ७) येऊं कशी सांग ना
कथासूत्र :अप्पासाहेब हे बजबजपूरचे संस्थानिक बहिरे होते.त्यांची मुलगी मृदुला आणि त्यांच्या दिवाणजींची मुलगी शांता दोघीही लग्नायोग्य झाल्या होत्या.अप्पासाहेबांना घरजावई हवा होता आणि तोही बहिराच हवा होता.त्यांची दवंडी ऐकून सरदार सारंगधर आणि सर्जेराव दंताळे येतात. पण मृदुला आपले लग्न अभयशी आणि शांता विलासशी ठरवतात.आणि अप्पासाहेबांच्या भयंकर अटींतून आपली सुटका करून घेतात.

सामायिक करा :

लग्नाला जातों मी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती