चाळ माझ्या पायात
१९६०

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/८९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी ३१००९/२२-१०-१९६०./ यू

निर्मिती संस्था :दीपकला फिल्मस्
निर्माता :बाळ सराफ
दिग्दर्शक :बाळ सराफ
कथा :कवि संजीव
पटकथा :कवि संजीव
संवाद :कवि संजीव
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :बाळ बापट, आय. बारगीर
संकलक :बाळ सराफ
गीतलेखन :कवि संजीव
कला :एस्. गायकवाड, म. द. ठाकुर
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :गणपत शिंदे
नृत्य दिगदर्शक :मा. सतीश येमूल
स्थिरचित्रण :जयसिंग माने, पी. विनोदराव
गीत मुद्रण :शंकरराव दामले, रॉबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :वसंत निकम
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
कलाकार :उषा किरण, विवेक, इंदिरा चिटणीस, वसंत शिंदे, लीला गांधी, बालनट कुमार किशोर, आणि नवतारका रत्ना, कमल जमेनीस, द.स. अंबपकर, राजा पंडित, चंद्रकांत गोखले
गीते :१) चाळ माझ्या पायात छुम छुम बाजे, २) डोईस भरजरी पदर, ३) किती येती तुझ्या आठवणी, ४) कातरली चिकणी सुपारी, ५) माझी ऐका ऐका लावणी, ६) राम घरी आला
कथासूत्र :डाँ. हर्षे हे भारतीय नृत्य,ताल पद्धतीवर ग्रंथ लिहावयास घेतात.त्यामुळे लावणी,छकडी,म्हारकी वगैरे नृत्यप्रकारांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी ते केशर या नायकिणीला बोलावतात.त्यांची वाग्दत्त वधू मीना ही नृत्य शिकत असते.मीनाचे वडील त्यांना त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी दहा हजार रुपये देणार असतात. केशरच्या साथीदाराला हे आवडत नाही आणि तो ते पैसे चोरतो.राधाकृष्ण ढोलकीवाल्यावर आळ येतो.पण खरे पैसे हर्षेंचा नोकर महादूकडे असतात.पैसे न सापडल्याने हर्षेंवर आळ येतो आणि त्यांना अटकही होते.हर्षेंसाठी केशर नृत्याचा कार्यक्रम करते आणि पैसे गोळा करते.हर्षेंचे पुस्तकही प्रकाशित होते व ते मीनाक्षी लग्न करतात.

सामायिक करा :

चाळ माझ्या पायात - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती