सवंगडी
१९३८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१५६२४ फूट/१७४मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १८९०४

निर्मिती संस्था :नटराज फिल्मस
दिग्दर्शक :पारिर्श्वनाथ आळतेकर
कथा :मामा वरेरकर
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :मधुसूदन पुरोहित
संकलक :रघुनाथ धिटे
कला :जी. वाटेगांवकर
ध्वनिमुद्रक :यशवंत कोठारे, बी. वकील
निर्मिती स्थळ :सरस्वती सिनेटोन, पुणे
चित्रलेखन :मधुसूदन पुरोहित
कलाकार :दुर्गा खोटे, विमला सरदेसाई, मुबारक, दादा साळवी, सुंदर नायमपल्ली, काका जोगळेकर, इमॅन्युअल, अनंत वरेरकर, बच्चू
गीते :१) उठी लवकरी भारता, २) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, ३) नग तेचि वाटतं करावं, ४) तव शशिवदना पाहुनि, ५) ज्या शिवेना भावना, ६) हा प्रेम विषाचा प्याला, सुरा करि पशू, ७) कुसुम एक कलिकेशी सांगे, ८) उजळल्या दाही दिशा, ९) कुणी जीवाचा प्राण, १०) नवे नवेसे जग हे.
कथासूत्र :रावसाहेब गिरिधरलाल आपला दूरचा पुतण्या मनोहर याला दत्तक घ्यायचं ठरवतात.त्यांचा सक्खा पुतण्या डाँ.दीनानाथ व त्यांचा भावी जावई मोहन याना डावलून.मनोहर आपली पत्नी मंजुळा हिच्यासह कोकणात स्थायिक झालेला असतो.पण मंजुळा त्याला मुंबईला बिऱ्हाड करायला भाग पाडते. डाँ. दीनानाथाच्या मनात सुडाची भावना असतेच.मंजुळेंची लीला आणि सुंदर यांच्याशी मैत्री होते.मनोहर सारखा साशंक असतो.डाँ. दीनानाथ त्याला प्रकृतीस्वास्थ्यासाठी मार्फियाची इंजेक्शन्स देतो.त्याची सवय लावतो.एकदा मंजुळा मनोहरला हे इंजेक्शन घेताना पाहते.रावसाहेबांच्या कानी सर्व प्रकार जातो.मनोहर मंजुळा परत कोकणात जातात आणि डाँ. दीनानाथचा डाव उधळतो.
विशेष :मुबारकचा एकमेव मराठी बोलपट, ड्रग्जचे दुष्परिणाम दाखवणारा पहिला चित्रपट. सवंगडी या मराठी बोलपटाची हिन्दी आवृत्ती ‘‘साथी” म्हणून वितरित करण्यात आली होती.

सामायिक करा :

सवंगडी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती