संत जनाबाई
१९३८

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/१३०२६ फूट/१४५मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९५३१

निर्मिती संस्था :रविंद्र पिक्चर्स
दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार, नारायण देव्हारें
कथा :मो. ग. रांगणेकर
पटकथा :मो. ग. रांगणेकर
संवाद :मो. ग. रांगणेकर
संगीत :विष्णुपंत पागनीस, सुरेश बाबू माने
छायालेखन :अनंतराव देव्हारें, आत्माराम खोपकर
संकलक :लिमये, कारखानीस, वागळे, वाडदेकर
गीतलेखन :मो. ग. रांगणेकर
कला :वसंत केळकर, मोरे
ध्वनिमुद्रक :सीताराम नाईक
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :हीराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर, शालिनीबाई, अनंत मराठे, एस्.बाबूराव, नानासाहेब सरपोतदार, बुलबुले, सुरेशबाबू माने, केसरबाई, वसंत कानसे
गीते :१) उभा विटेवरी किती काळ ऐसा, २) विठ्ठला विठ्ठला पंढरीचा राया,
३) दळिता कांडिता तुज गाईन, ४) माझा शीण भाग गेला, ५) सांग सख्या राजसा, ६) ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ७) गाता विठोबाची किर्ती, ८) सोडी रवी हात हरी हे, ९) सख्या पंढरीच्या राया, १०) अरे मेल्या विठ्या, ११) धन्य ती पंढरी धन्य पंढरीनाथ.
कथासूत्र :संत नामदेवांनी एकदा हट्ट घेतलेला असतो की, विठ्ठलानं नैवेद्य भक्षण केल्याशिवाय आपण अन्नग्रहण करणार नाही.अखेर या भक्ताची इच्छा विठ्ठल पूर्ण करतो.जनाबाईला हे कळल्यावर तीही देवभक्त होते.एकदा विठ्ठल जनाबाईंवर प्रसन्न होऊन आपली वैजयंती माळ तिथं ठेवून जातो.वैजयंती नाहीशी झाल्यावर पंचायतीत चोरीची तक्रार नोंदविली जाते.तो आळ जनाबाईवर येतो.तिला कडक शिक्षा फर्मावली जाते.पण विठ्ठल तिची सुटका करतो.

सामायिक करा :

संत जनाबाई - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती