राजा गोपीचंद
१९३८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२४१७ फूट/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९५०५

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :सी.बालाजी
छायालेखन :एम्.एम्.पुरोहित
संकलक :दादासाहेब तोरणे
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :बाळ गजबर
ध्वनिमुद्रक :बी.एस. अहलुवालीया
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :चंद्रकांत, रानडे, गंगाधरपंत लोंढे, रत्नप्रभा, लीला चंद्रगिरी, उषा मंत्री, बकुळाबाई, सुशिला, दिनकर कामण्णा, डोंगरे, जयशंकर दानवे
गीते :१) धन संपदा कशाला, २) देवा दारी दया, ३) जीव गुंतला, ४) जगी सौख्य ना, ५) चिमटा उचल लोटा, ६) हनुमंतजीला भज रे, ७) माझा रजा काय रुसला, ८) जय जय अलख निरंजन, ९) माझे आई गे, १०) कां नेई माता, ११) आदेश गुरुराज, १२) जय जय आलख निरंजन. देव दावी दया आजी ही, भेसूर हें तम, अलख निरंजन संन्यासी ये माई. रूम झुम छुम छुम चल सखी
कथासूत्र :नाथ सांप्रदायाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कर्ता जालंदरनाथ याला ईश्वरी आदेश येतो की,हेलापट्टमचा राजा गोपीचंद यास या पंथाची दीक्षा द्यावी.राजमातेला या पंथाचे तत्वज्ञान पटते व आपल्या पुत्रानं हा मार्ग अनुसरावा असे तिला वाटते.राजाच्या सोळाशे राण्यातील एक राणी रंजनकोर हिचा विचार वेगळाच असतो.ती राजमातेवर विषप्रयोग करते.परंतु अखेरीस कानिफनाथांची गुरुभगिनी राजाला मानवी जीवन कसं असार आहे हे पटवून देण्यात यशस्वी होते आणि राजा गोपीचंद राज्यत्याग करून नाथपंथाची दीक्षा घेतो.
विशेष :मराठी आणि हिन्दी अशा दोन्ही आवृत्त्या प्रदर्शित झाल्या.

सामायिक करा :

राजा गोपीचंद - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती