नंदकुमार
१९३८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२७९३ फूट/१४३मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १८८७२

निर्मिती संस्था :जयश्री फिल्मस
दिग्दर्शक :केशवराव बी. धायबर
कथा :मो.ग.रांगणेकर
पटकथा :मो.ग.रांगणेकर
संवाद :मो.ग.रांगणेकर
संगीत :सुरेशबाबू माने
छायालेखन :सुरेंद्र पै
संकलक :एम्.टी.लिमये
गीतलेखन :मो.ग.रांगणेकर
कला :शंकरराव हफ्ज शिंदे, वसंत पेंटर
ध्वनिमुद्रक :वाय्.एस्.कोठारे
ध्वनिमुद्रिका :ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया, मुंबई यांनी यंग इंडिया लेबलवर ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :सरस्वती स्टुडिओ, पुणे
कलाकार :दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे, नानासाहेब चाफेकर, अनंत मराठे, गोविंद कुरवाळीकर, जयश्री कामुलकर (शांताराम)
गीते :१) चला जाऊ रमवायाते, २) ओवाळुया आरती, ३) कृष्ण कृष्ण गोड नाम, ४) कसा बाई माझा बाळ, ५) शाम डोली हा मनीं, ६) बांधुनि असा मजला गे, ७) बाळा घे छकुल्या घास हा, ८) किती लावसि मजला, ९) नमित गजवदना, १०) बघ रोखुनि आला, ११) भावना पाश हा टाकिला, १२) भवसागरी आधार फुलले खुलले किती गोकुळ हे, १३) मारू नको पिचकारी, १४) चिमण्या छकुल्या लडिवाळा, १५) सगुण तुझं ध्यान, १६) का रोखिसी अमुची वाट, १७) चल हरी कुंजवनी, १८) जाई पहा आधार.
कथासूत्र :कृष्णाचं बालपण,त्याच्या खोड्या,त्यानंतर केलेले चमत्कार यांनी युक्त चित्रपट.कंसाला जेव्हा कळतं,की आपला शत्रू,आपला नवजात भाचा कृष्ण गोकुळात सुखरूप पोहोचला आहे,तेव्हा पुतना या जारणमारण करणाऱ्या स्त्रीला कंस गोकुळातील सर्व नवजात बालकांना ठार मारण्यासाठी धाडतो.पण तीच कृष्णाच्या दैवी शक्तीमुळे मारली जाते.कृष्ण वाचतो-वाढतो.
विशेष :प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर केशवराव धायबर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. ‘नंदकुमार’ मराठी बरोबरच हिन्दीतही निर्माण केला होता.

सामायिक करा :

नंदकुमार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती