माया बाजार
१९३९

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२०२६ फूट/१०९मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २१४३९

निर्मिती संस्था :प्रभा चित
निर्माता :राजा पंडित
दिग्दर्शक :जी.पी.पवार
कथा :ना.वि.कुलकर्णी
पटकथा :ना.वि.कुलकर्णी
संवाद :ना.वि.कुलकर्णी
संगीत :पंडितराव नगरकर
छायालेखन :माचवे
संकलक :बाबूराव लिमये
गीतलेखन :शंकरराव करंबेळकर
कला :शंकरराव शिंदे
गीत मुद्रण :शालिनी स्टुडियो, कोल्हापूर
ध्वनिमुद्रक :जोशी
निर्मिती स्थळ :शालिनी स्टुडियो, कोल्हापूर
रसायन शाळा :शालिनी स्टुडियो, कोल्हापूर
कलाकार :मा. सुरेश, पंडितराव नगरकर, गोविंद कुरवाळीकर, राजा पंडित, शशिकला, एन्.एम्.जोशी, जी.आर्.सँडो, शामाबाई, इंदुमती मिस्त्री, रंभाराणी, कमळाबाई, रोहिणी
गीते :१) कुठवरी करु मी याचना, २) मनमोहन मुरलीवाला, ३) मोहक नाजुक या लीला, ४) हसले जरि फूल असे, ५) तू राणी, तू माझा राया, ६) हे रंग कपोली कां सुकले, ७) रूमझुम नाचत पदतल ठुमकत, ८) खेळू सख्या चल शांत जळी, ९) गाल तव हंसरे का, १०) जय हरी जय हरि मोद भरे गाऊ, ११) दाखवि हरी चातुरी रे, १२) धाव आता मम जननी, १३) आजि सुखकर दिन हा पातला.
कथासूत्र :आपली कन्या वत्सला दुर्योधनपुत्र लक्ष्मण यास देऊ असं वाचन बलराम शकुनीमामांना देतो.पण वत्सला आणि अर्जुनपुत्र अभिमन्यू एकमेकांवर अनुरुक्त असतात.लक्ष्मण वत्सलेला एकदा मृगयेसाठी घेऊन जातो.तिथं भीमपुत्र घटोत्कच याच्या चमत्कार शक्तीच्या फेऱ्यात ते सापडतात.अभिमन्यू व घटोत्कचाचे द्वंद्व होऊन दोघेही मारले जातात.सुभद्रा कृष्णाचा धावा करते.कृष्ण दोघांनाही पुनरुज्जीवन देतो.घटोत्कच मग पांडवांच्या मदतीला उभा राहतो.आपल्या चमत्कार सामर्थ्यावर तो कौरवांना चक्रावून टाकतो.वत्सलेला घेऊन येतो.ती अभिमन्यूशी विवाहबद्ध होते.

सामायिक करा :

माया बाजार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती