नेताजी पालकर
१९३९

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२२६५ फूट/११२ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०६२१

निर्मिती संस्था :अरूण पिक्चर्स
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :सी. बालाजी
छायालेखन :साजू नाईक
गीतलेखन :भालजी पेंढारकर
ध्वनिमुद्रक :चिंतामणराव मोडक
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :ललिता पवार, बकुळाबाई, भाऊराव दातार, मा. विठ्ठल, आय.टी.निंबाळकर, जी.आर.सँडो, कृष्णराव गोटे, शाहीर नानिवडेकर, आनंदराव, शेख
गीते :१) ऊठ ऊठ भारता, २) स्वराज्याच्या स्वधर्माच्या ध्वजा रे, ३) बोल प्रीतिचे हसूनिया, ४) एक मुजरा महादेवाला, ५) बघ बघ तिन्ही सांज झाली, ६) छळिता का या जीवा, ७) आला बहर नारी नवतीला.
कथासूत्र :कल्याणचा सुभेदार सुभान शिवरायांची अपकीर्ती करून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य स्थापण्यात विघ्न आणायचा प्रयत्न करतो.यासाठी तो नेताजी पालकर या एका खेड्याच्या पाटलाला हुसकून लावतो व एका दरोडेखोराच्या मदतीने एक देखणी मराठा तरुणी पळवतो.शिवाजीला विक्री करण्यासाठी तो तिचा उपयोग करणार असतो.पण नेताजी दरोडेखोराला द्वंद्वात ठार करून शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत सहभागी होतो.

सामायिक करा :

नेताजी पालकर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती