राजा श्रीयाळ
१९३९

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/९९४७ फूट/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २१२३७

निर्मिती संस्था :उदय पिक्चर्स
निर्माता :एस्.ए.गद्रे
दिग्दर्शक :जी.पी.पवार, मनोहर घटवाई
कथा :स.अ.शुक्ल
पटकथा :स.अ.शुक्ल
संवाद :स.अ.शुक्ल
संगीत :सदाशिव नेवरेकर
छायालेखन :आर.एम्.रेळे
संकलक :विठ्ठल बनकर
गीतलेखन :स.अ.शुक्ल
निर्मिती स्थळ :इंपीरियल फिल्म कंपनी, मुंबई
कलाकार :भाऊराव दातार, बळवंतराव परचुरे, कुमार दातार, मनोहर घरवाई, प्रमिला, मधुकर गुप्ते, खरे, साठे, अंतोबा कुलकर्णी, सुशिलाबाई, केसरबाई
गीते :१) जयशंकर महादेव, २) खेळूया नाचूया हसुनीया जगता, ३) लीला दावुनी नवल शिव हरा, ४) काहूर हे मनी का, ५) चला खेळू खेळ मौजेचा, ६) दावी दया भगवाना, ७) जय जय शंकर भोळा, ८) यारे या भरभर प्या, येरे राजसा येरे पाडसा, ९) चिलया मोती दाणा, १०) चिलया बाळ चिमण्या, ११) शिवहर नटवर सजला.
कथासूत्र :राजा श्रीयाळ शिवभक्त.एकदा शिव त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो.सर्व अभ्यागत जेवून गेल्यावर भोजन करण्याची राजाची प्रथा असते.वेष बदललेला शिव कोवळ्या बालकाच्या मांसाची इच्छा व्यक्त करतो.राणी आपला पुत्र चिलयाचे मांस त्याला वाढते.शिव प्रसन्न होऊन चिलया जिवंत होतो.

सामायिक करा :

राजा श्रीयाळ - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती