मराठ्याची मुलगी
१९३८

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१११४० फूट/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९७११

निर्मिती संस्था :आर्टिस्टस् कंबाईन
निर्माता :पांडुरंग सी. तलेगिरी
दिग्दर्शक :पांडुरंग सी. तलेगिरी
कथा :सरस्वतीकुमार
छायालेखन :पांडुरंग तलेगिरी, दिवेचा
गीतलेखन :स.अ. शुक्ल, न.ग. कमतनूरकर
ध्वनिमुद्रक :लोणकर, चार्ली
निर्मिती स्थळ :सरस्वती स्टुडिओ, पुणे
कलाकार :बोरकर, गणपतराव बोडस, परशुराम सामंत, शेटे, गोखले, मराठे, भांडारकर, टकले, पळशीकर, भोसले, हावळ, मा. मनोहर, शंकर कांबळे, दत्तोबा कांबळे, गंगूबाई, सुशिला, सुरंग
गीते :१) देवा तूच आता आधार, २) मै गुलाम तेरा, ३)लोपे तिमिरी, धु्रवतारा, ४) जगी कोण तुझ्याविण त्राता, ५) अजुनी येशी ना, खट दैव नारीचा नाही, ६) अंधारी रात्रीच्या प्रहरी शिड्या सोडून शिवराम निसटला.
कथासूत्र :१६८९ मधली कथा.राजाराम महाराज जिंजीच्या वाटेवर असताना त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास औरंगजेब जहागीर इनाम मिळेल म्हणून जाहीर करतो.दौलतरावसारखा शूर मराठाही या मोहाला बळी पडून महाराजांच्या हालचालींची खबर देण्यास उद्युक्त होतो.त्याची स्वाभिमानी पत्नी मंगला हिला जेव्हा हा प्रकार कळतो,तेव्हा स्वराज्यासाठी पतीहत्त्या करण्यासही ती कचरत नाही.राजाराम महाराज सुखरूपपणे जिंजीस पोहोचतात.

सामायिक करा :

मराठ्याची मुलगी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती