माझा मुलगा
१९३८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४४८२ फूट/१३१मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २००४०

निर्मिती संस्था :प्रभात चित्र
दिग्दर्शक :के. नारायण काळे
कथा :य.गो.जोश
पटकथा :य.गो.जोश
संवाद :य.गो.जोश
संगीत :केशवराव भोळ
छायालेखन :व्ही. अवधूत
गीतलेखन :शांताराम आठवले
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
निर्मिती स्थळ :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :शांता हुबळीकर, शाहू मोडक, मामा भट, वसंत ठेंगडी, वत्सलाबाई जोशी, बालकराम, सुंदराबाई, मा. छोटू
गीते :१) होईल गंमत देशिल जम्मत मला आणुनि, २) मज फिरफिरूनी छळिसी कां, ३) जीवा तुझ्या मोहिनीने, ४) उसळत तेज भरे गगनात, ५) पाहू रे किती वाट, ६) दुनिया ही मायेचा, ७) या सगळेजण लौकर या.
कथासूत्र :दिवाकर हा देशसेवा आणि समाजसेवा यानं झपाटलेला तरुण.त्यानं नोकरी करून संसारात लक्ष घालावं अशा विचारसरणीचे त्याचे वडील.या दोन मतप्रवाहांच्या संघर्षाची कथा.दिवाकराच्या आदर्श ध्येयवादानं नलिनी ही श्रीमंत तरुणी त्याच्याकडे आकर्षित होते.पण दिवाकरचा तथाकथित मित्र विठ्ठलराव याच्या चिथावणीवरून नलिनी दिवाकरविरुद्ध नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशांच्या जोरावर निवडून येते.पुढे तिचा गैरसमज दूर होऊन दिवाकर-नलिनी यांचं मिलन होतं.
विशेष : हिंदी आवृत्ती ‘मेरा लडका’

सामायिक करा :

माझा मुलगा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती