ज्वाला
१९३८

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/१४४५५ फूट/१६१मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९११९

निर्मिती संस्था :हंस चित्र
निर्माता :मा. विनायक
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :वि. स. खांडेकर
पटकथा :र.शं.जुन्नरकर
संवाद :वि. स. खांडेकर
संगीत :खाँसाहेब धम्मन खाँ
पार्श्वसंगीत :दादा चांदेकर
छायालेखन :पांडुरंग नाईक
संकलक :विठ्ठल बनकर
गीतलेखन :वि. स. खांडेकर
कला :वि.ह. पळणीटकर
रंगभूषा :शंकर गौड
वेषभूषा :विश्वास
स्थिरचित्रण :दिनकर बराले
रसायन :गो. गो. कांबळे
ध्वनिमुद्रक :चिंतामणराव मोडक
ध्वनिमुद्रिका :हिज मास्टर्स व्हाइस, मुंबई
निर्मिती स्थळ :हंस चित्र, कोल्हापूर
रसायन शाळा :गो.गो.कांबळे
कलाकार :चंद्रमोहन, रत्नप्रभा, मा. विनायक, आशालता, चंद्रकांत, बाळ ढवळे, बुलबुले, रजनी
गीते :१) होई दूर अंधकार, २) कोमेजे का राजा, ३) हुरहुर लागे ही जीवाला, लाविता तीट ना, ४) अभागी जीवा लाभे, ५) अंगाई पुरे बाळा, ६) पाकळ्या या गळाल्या पाहुनि ज्याळा, नवरीही नगरीना, ७) अंगाई पुरे चाळा, ८) फुलली दुनिया बाग, ९) मालवू नको रे दीप, १०) मधु बोल बोल फुलपांखरा
कथासूत्र :विजयी सेनापती अंगार राजधानीत परततो ते राजा होण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगून.या अभिलाषेपायीं तो राजावर विषप्रयोग करवितो.राज्यावर आलेल्या राजपुत्राकडे मोहरा वळवतो.अंगारची पत्नी मंगला त्याची चूक त्याला दाखवून देते व आपली राजनिष्ठा प्रगट करते व इथेच अंगारचा शेवट होतो.
विशेष :जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपीअरच्या मॅकबेथ या नाटकावर आधारित एकमेव मराठी चित्रपट. चंद्रमोहनचा पहिला मराठी चित्रपट आणि हिन्दी भाषेतून ज्वालाची आवृत्ती प्रदर्शित केल्या होत्या.

सामायिक करा :

ज्वाला - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती