गोपालकृष्ण
१९३८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/११९२५ फूट/११३मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९१६४

निर्मिती संस्था :प्रभात चित्र
दिग्दर्शक :विष्णूपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल
कथा :शिवराम वाशीकर
पटकथा :शिवराम वाशीकर
संवाद :शिवराम वाशीकर
संगीत :मा. कृष्णराव
छायालेखन :व्ही. अवधूत
गीतलेखन :शांताराम आठवले
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रिका :दि नॅशनल ग्रामोफोन रेकॉर्ड मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी लि. मुंबई, यांनी यंग इंडिया लेबलावरून ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :राम मराठे, शांता आपटे, परशराम, शंकर, गणपतराव, हरिभाऊ, मानाजीराव, सोफिया
गीते :१) तू माऊली जगाची, २) गौळणी गे साजणी गे थांब जरा, ३) झर झर झर धार झरे, ४) शिशुपण बरवे हृदया वाटे, ५) आला वनमाळी आला, ६) गुणशीला, तू अतुला, ७)वंदिन राधा बाला, ८) घेई रे सोनुल्या, ९) उमगायची न्हीई कुना, १०) गोकुळीचे वीर आम्ही, ११) रत्नावानीं गाई छान, १२) तुझाच छकुला तुझाच गे मम माऊली, १३) भाग्यवती ही कपिला धेनु सजविते १४) हासत नाचत जाऊ.
कथासूत्र :कंसाचा भाऊ केशी दुष्ट हेतूने गोकुळात तळ ठोकतो.त्याच्या सैन्यासाठी लागणाऱ्या दुधाकरिता पाचशे गाई पाठवाव्यात अशी कंसाची आज्ञा असते. कृष्णाच्या पाठबळावर नंद ही आज्ञा मान्य करत नाही.अनयाकरवी जबरदस्तीने गायीचे अपहरण करण्याचाही प्रयत्न होतो.कृष्णाला ठार मारण्याचा केशीचा डाव फसतो व त्याच्यावरच उलटतो.कृष्ण आणि त्याचे सवंगडी याना त्यांच्या गायींसकट बंदिस्त केलं जातं.शेवटी गुरं उधळून साऱ्या तळाचा सत्यानाश करतात.त्यात केशीही मारला जातो.संतप्त कंस गोकुळावर पर्जन्यास्त्र सोडतो.प्रलय होतो.पण कृष्ण गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाला वाचवतो.
विशेष :दुसर्‍या गायकांकडून गाणी म्हणवून घेऊन ‘व्हर्जन रेकॉर्डींग’ या चित्रापासून सुरू झाले. यंग इंडियाने काढलेल्या रेकॉर्डस नंतर एच.एम.व्ही. ने काढल्या.

सामायिक करा :

गोपालकृष्ण - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती