ध्रुवकुमार
१९३८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४७१० फूट/१३४मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९१४२

निर्मिती संस्था :शालिनी सिनेटोन
दिग्दर्शक :के.पी.भावे
कथा :ना.ह.आपट
पटकथा :ना.ह.आपट
संवाद :ना.ह.आपट
संगीत :विश्वनाथबुवा जाधव
छायालेखन :के. व्ही. माचवे
गीतलेखन :प.स.देसाई
कला :गणपतराव वडणगेकर
ध्वनिमुद्रक :एम्.जी.श्रीखंडे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :कुमार प्रभाकर, कुमार मनोहर, वैशंपायन, वेदपाठक, राजा परांजपे, दिनकर दुधाळे, इंदिरा वाडकर, रोहिणी, इंदूबाला, सोनुबाई
गीते :१) वंदन करु या आज, २) हाय जगीं या, ३) ही खोटी माया कां, ४) काय ही अधिरता, ५) देवा माया तव न कळे, ६) मम मनीं भाव दुजा, ७) उगी नीज कसा, ८) दिधला तुला आज, ९) सुदिन आज पहा, १०) गेलासि कुठे बाळा ये, ११) प्रभु सदया नई, १२) ये ये बाळा चाळ न करीं, १३) गुरू तोषविला, १४) जगी धन्य तूं होसी बाळा.
कथासूत्र :उत्तानपाद राजा आणि राणी सुनीताचा पुत्र ध्रुव.दुसरी राणी सुरुची हिचा पुत्र उत्तम.ध्रुव सगळ्यांचाच लाडका.फक्त त्याची सावत्र आई त्याचा मत्सर करीत असते.राज्यपद पित्याच्यानंतर उत्तमला मिळावं अशी तिची इच्छा असते.एकदा ध्रुव पित्याच्या मांडीवर बसला असता सुरुची त्याला लाथेनं ढकलते.अपमानित झालेला ध्रुव अरण्यात तपश्चर्येला निघून जातो आणि उग्र तपस्येच्या बळावर ध्रुवतारा म्हणून चमकू लागतो.

सामायिक करा :

ध्रुवकुमार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती