देवता
१९३९

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३३५८ फूट/११९मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०२७९

निर्मिती संस्था :हंस चित्र
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :वि.स.खांडेकर
पटकथा :वि.स.खांडेकर
संवाद :वि.स.खांडेकर
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :पांडुरंग नाईक
संकलक :कांबळे
गीतलेखन :वि.स.खांडेकर, भा.रा.तांबे
कला :पळणीटकर
रंगभूषा :शंकर गौड
वेषभूषा :विश्वास
रसायन :गोपाळ कांबळे
ध्वनिमुद्रक :अहलुवालिया
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड, मुंबई
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :बाबूराव पेंढारकर, मीनाक्षी, इंदिरा वाडकर, दादा साळवी, दामुअण्णा मालवणकर, सरदार, विभावरी, बेबी विमल
गीते :१) कुणीतरी लाजत पाहत कां, २)या या राया हासत या, ३) सख्या राया या या, ४) नाच नाच किरणा, ५) सखी भृंग दूर भुलला, ६) धाव पाव नंदलाल, ७) मोहपाशी गुंतसी कां, ८) मोही का माया, ९) मधु हांस बाळा धाव पाव नंदलाल बोल गोड बोला. १०) प्रेमवेडी बालिका, ११) तुझ्या गळां माझ्या गळां
कथासूत्र :सुशीला तिचा धाकटा भाऊ आणि छोटी बहीण यांचा एकमेव आधार.ती दासोपंत या श्रीमंत विधुराशी लग्न करते.हे लग्न तिनं करू नये म्हणून तिचा सावत्र मुलगा प्रसिद्ध प्राध्यापक अशोक निष्फळ प्रयन्त करतो.अशोकनं आपल्या सासूबाईंना कॉलेज हॉस्टेलमध्ये आश्रय दिलेला असतो.तिला घालवून देण्याचं त्याच्यावर दडपण येतं.आपल्यामुळे आलेल्या संशयाचे सुशीला निराकरण करते आणि परागंदा होते.सर्वजण तिला शोधतात आणि शेवटी आनंदीआनंद होतो.
विशेष :बाबुराव पेंढारकर यांनी नायकाची भुमिका केलेला पहिला चित्रपट. याआधी चित्रपटातून ते खलनायकाच्या भूमिका करीत असल्याने या चित्रपटाच्या वेळी ‘‘पडद्यावरचा बदमाश सुधारला” अशी जाहिरात करण्यात आली होती. ही कल्पक जाहिरात केली होती श्यामराव ओक यांनी. चित्रपट व खांडेकरांची ‘‘रिकामा देव्हारा” ही कादंबरी एकाच वेळी प्रसिद्ध झाली. देवता वरूनच पुढे विनायकरावांनी आपला अखेरचा हिन्दी चित्रपट ‘‘मंदिर” काढला होता. बेबी नंदाने ‘‘मंदिर” मध्ये प्रथम भूमिका केली.

सामायिक करा :

देवता - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती