चंद्रराव मोरे
१९३८

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४४५३ फूट/१३१ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १८६४९

निर्मिती संस्था :जनरल फिल्मस् लिमिटेड
दिग्दर्शक :आरोलकर
कथा :रघुवीर रेळे
पटकथा :विष्णुपंत औंधकर
संवाद :विष्णुपंत औंधकर
संगीत :द. प. कोरगांवकर (के.दत्ता)
छायालेखन :पु.गो.कुकडे
संकलक :बरोडकर
गीतलेखन :मो. ग. रांगणेकर, विष्णुपंत औंधकर, मुन्शी अजीज
कला :गांग नाईक
गीत मुद्रण :बी. ओ. अेजफ्
ध्वनिमुद्रक :सरैय
निर्मिती स्थळ :फिल्मसिटी, (ताडदेव),मुंबई
कलाकार :विष्णुपंत औंधकर, भाऊराव दातार, बाबूराव संसारे, टकले, विनायक काळे, मारुतिराव पहेलवान, गोटीराम, झुंजारराव पवार, दिनकर ढेरे (कामण्णा), अमीना, जयश्री कामुलकर, गंगा, सरदार, बी.नांद्रेकर, शारदा पंडित
गीते :१) दिपवित शीलध्वज समरी निघाला, २) दो दिवसाची माया सारी, ३) मन वेडे कैसे पहा सखे, ४) चल गे सखि जाऊं, ५) नग करू नारी मन भंग गं, ६) जो जो निज लडिवाळा, ७) आधी नमुनि भवानी, ८) झणि यें सखये चल मारू भरारी, ९) मन काहे करे बिचार रे, १०) का हुरहुरी ही जीवा, ११) प्रेमाघात कैसारे रूचला, १२) प्रियतम हा अमुचा नव झेंडा.
कथासूत्र :शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना परकीय शत्रूप्रमाणं स्वकियांशीही मुकाबला करावा लागला होता.त्यातलाच जावळीचा सरदार चंद्रराव मोरे.विजापूरचा अभेद्य किल्ला त्याच्या ताब्यात असतो.चंद्रराव मोऱ्यांची कन्या मोहना हिच्यावर शिवरायांचा शिलेदार मुरार याचा जीव असतो.मुरारच्या मदतीनं महाराज चंद्ररावाला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात.चंद्ररावाशी लढाई करावी लागते.त्यात चंद्ररावाची हार होते.शेवटी मुरार-मोहनाचं मिलन होतं.
विशेष :जयश्री कामुलकरांचा पहिला चित्रपट. शारदा पंडित पुढे शारदा मुखर्जी म्हणून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल झालेल्या विदुषीनेही ह्या चित्रपटांत काम केले होते.

सामायिक करा :

चंद्रराव मोरे - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती