ब्रह्मचारी
१९३८

विनोदी
३५ मिमी/कृष्णधवल/१३७१९ फूट/१२६ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९५७३

निर्मिती संस्था :हंस चित्र
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :प्र.के.अत्रे
पटकथा :प्र.के.अत्रे
संवाद :प्र.के.अत्रे
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :पांडुरंग नाईक
गीतलेखन :प्र.के.अत्रे
कला :पळणीटकर
रंगभूषा :शंकर गौड
वेषभूषा :विश्वास
रसायन :गोपाळ कांबळे
ध्वनिमुद्रक :चिंतामणराव मोडक
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई यांनी टिवन लेबलवर ध्वनीमुद्रिका काढल्या होत
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :गोपाळ कांबळे
कलाकार :मा. विनायक, मीनाक्षी, दादा साळवी, विष्णूपंत जोग, दामुअण्णा मालवणकर, नूरजहाँ, बापूराव पवार, जावडेकर
गीते :१) प्रीतीवीण वेडापिसा जीव, २) चला चला रे सुधारणेचा, ३) गरगरा फिरवूं हा चरखा, ४) यमुनाजळी खेळू खेळ कन्हेय्या कां, ५) यावा घ्यावा खावा सदा हलवा, ६) फिरवाना सखया डोळा, ७) घे भरारी उंच आता, ८) उठा बंधुनो उठा लवकरी, ९) या हो राजसा या.
कथासूत्र :औदुंबर कायम ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतो.वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करायला नकार दिल्यानं त्याला घराबाहेर काढतात.त्याच्या नशिबी खडतर आयुष्य येतं.पोट भरण्यासाठी तो हलकीसलकी कामं करतो.पण पुढं वडिलांनी ठरविलेल्या मुलीच्या प्रेमात पडून प्रतिज्ञाभंग करतो.
विशेष :मीनाक्षी शिरोडकर यांच्या रूपाने स्विमिंग ड्रेस मधील नायिका प्रथम पडद्यावर आली. दोन वेण्यांची फॅशन ‘मिनाक्षी फॅशन’ म्हणून लोकप्रिय झाली. दामुअण्णा मालवणकरांचा बगाराम ही अतोनात लोकप्रिय झाला. मराठी बरोबरच ब्रह्मचारीची हिन्दी आवृत्ती ही प्रदर्शित केली होती. गोहर पारितोषिक मा. विनायक यांना मिळाले.

सामायिक करा :

ब्रह्मचारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती