भगवा झेंडा
१९३९

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/११६२६ फूट/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०९१४

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
निर्माता :दादासाहेब तोरणे
दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार
कथा :माधवराव जोशी
पटकथा :माधवराव जोशी
संवाद :माधवराव जोशी
संगीत :सुरेशबाबू माने
छायालेखन :पुरोहित, शिंदे
गीतलेखन :माधवराव जोशी
कला :बाळ गजबर
ध्वनिमुद्रक :जाधव, पाटील
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :गंगाधरपंत लोंढे, आठवले, चंद्रकांत, दिनकर कामण्णा, डोंगरे, दुधाळे, शीलवती, रत्नमाला
गीते :१) कल्याण करी रामराया, २) पान विडे देते करुनि, ३) भरज्वानीचं वावटळ सुटलं, ४) दिनानाथ हा राम कोदंडधारी, ५) उडुनि जासी का गं, ६) आता आली धक्काधक्की, ७) भगवा झेंडा होई तारक सकलाला, ८) तुझ्या संगतीचा लागला चटका, ९) मंदिल जरी डोईस भरजरी, १०) संकटकाळी दीनदयाळा.
कथासूत्र :आदिलशहाच्या मर्जीतील सरदार जाधवराव, वडगाव या खेड्यावर आपली सत्ता गाजवीत असतो.रामदास स्वामी या गावकऱ्यांना चेतावणी देऊन त्यांच्यात शौर्य,धैर्य निर्माण करतात.शेवटी चंद्रगडावर भगवा ध्वज फडकू लागतो.

सामायिक करा :

भगवा झेंडा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती