बाजीप्रभू देशपांडे
१९३९

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२९२४ फूट/११८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०१८५

निर्मिती संस्था :महाराष्ट्र पिक्चर्स
दिग्दर्शक :बाळासाहेब यादव
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :बाळासाहेब यादव, झुंजारराव पवार, गणपत बकरे, अहमदखान, बापूराव पवार, नूरजहान, शारदा
गीते :१) अजुनी वय लहान येऊ द्या, २) देह तुमच्या चरणीं अर्पण, ३) भान नसे सजणा, ४) जिरली ना शूर शिपाई, ५) ऐ शोख लिये याद लिए, ६) दयाळा करी धावा, ७) लई झालं हे देवा, ८) जाने क्या क्या तेरी आँखों में है, ९) ज्याची किर्ती अजरामर झाली.
कथासूत्र :बाजीप्रभू देशपांडे या शूर सरदाराला आपल्या बाजूने वळवण्यात शिवाजीराजे यशस्वी होतात.शिवाजीराजांचे दिवसेंदिवस बसत चाललेले बस्तान बादशहाला सहन होणे शक्य नव्हते.राजांना गिरफदार करण्यासाठी फार मोठया प्रमाणात मोगल सैन्य येऊन ठेपते.या सैन्याला हुलकावणी देऊन राजे पन्हाळगडाच्या आश्रयाला जातात.त्यांचा पाठलाग चालू असतो.राजे गडावर फोहोचताच तोफेचा आवाज व्हायचा असतो.तोवर तुटपुंज्या सेनेसह बाजी पावनखिंडीत शत्रूला थोपवून धरतो व तोफेचा आवाज येताच समाधानाने प्राण सोडतो.

सामायिक करा :

बाजीप्रभू देशपांडे - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती