अकरावा अवतार
१९३९

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२६५१ फूट/१११मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०६०७

निर्मिती संस्था :मिनर्व्हा मुव्हिटोन
दिग्दर्शक :केशवराव धायबर
कथा :स.अ.शुक्ल
पटकथा :स.अ.शुक्ल
संवाद :स.अ.शुक्ल
संगीत :जी.पी कपूर
छायालेखन :एस्. डी. पाटील
संकलक :ए.के.चटर्जी
गीतलेखन :स.अ.शुक्ल
कला :जी. मोरे
ध्वनिमुद्रक :केकी, एदलजी
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :अमीनाबाई, विमलाबाई वशिष्ठ, एस्.बाबूराव, के. आठवले, मारुतीराव पहेलावान, केशवराव धायबर, जाधवराव, मा. बालकृष्ण
गीते :१) दे रविराज शुभ संदेश, २) निशिदिनी जिवास लागत घोर, ३) घेईल शिव अवतार, ४) जादूगिरी ही किती गं फुलली, ५) मनुजा मोह बंधन तोड, ६) माऊली येऊं दे करूणा, ७) जो जो जो रे शिवराया सुरगुण मंडित राया बाळ जो जो रे.
कथासूत्र :मराठेशाही मोगली पंजातून वाचवण्याच्या शहाजीराजे यांच्या प्रयत्नांना त्यांच्या श्वशुरांकडूनच विरोध होतो.मग शिवाजीचा जन्म,शहाजीराजे यांचे मोठेपण,शिवजन्माच्या वेळी जिजाबाईंची झालेली आबाळ,बाल शिवाजीचं पालनपोषण होताना जिजाबाईंकडून त्याला मिळालेली मौलिक शिकवण,मराठ्यांमध्ये केलेली जागृती या कथाभाग या चित्रपटात आहे.

सामायिक करा :

अकरावा अवतार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती