झिपऱ्या
२०१७

सामाजिक
१३० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ६/६/२०१७ क्र.- डीआयएल/२/३१/२०१७ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :ए.आर.डी. एंटरटेनमेंटस् ,दिवास प्रॉडक्शन्स
निर्माता :रणजित दरेकर आणि अश्विनी दरेकर
दिग्दर्शक :केदार वैद्य
कथा :अरुण साधू
पटकथा :केदार वैद्य
संवाद :केदार वैद्य
संगीत :अरिफ, ट्रॉयदिन गोमेस, समीर सापतीसकर
पार्श्वसंगीत :रौफिक कुरेशी
छायालेखन :राजेश नाडोने
संकलक :देवेंद्र मुरडेश्वर
गीतलेखन :अभिषेक, समीर सामंत
कला :विनायक केतकर
रंगभूषा :विद्याधर भट्टे
नृत्य दिगदर्शक :उमेश जाधव
साहसदृश्ये :अब्बास अली मोगल
पब्लिसिटी डिझाईन :सचिन गुरव
ध्वनि :अनमोल भावे
कलाकार :प्रथमेश परब, हंसराज जगताप, अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, चिन्मय कांबळी, अमान अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर, प्रविण तरडे.
पार्श्वगायक :दिव्या कुमार, शेखर रावजीवनी
गीते :१) हम ओ जुते है जमिपे होते है पर तारे छुते है. २) धडधड्त्या हृदयी हूरहूरती स्वप्नांच्या कुठवर किरणांच्या आशेवरती जगणे
कथासूत्र :रस्त्यावर जगणाऱ्या  मुलांच्या आयुष्यावरील चित्रपट.झिपऱ्या,अस्लम,नाऱ्या,पोम्ब्या,गंजू,दाम्या हे स्टेशनवर बूट पॉलिशचा धंदा करत असतात. पण उस्ताद पिंगळ्याभाय त्यांनी कमावलेला पैसा काढून घेत असतो. झिपऱ्याची बहीण लीलावर उस्तादची वाईट नजर असते.एकदा झिपऱ्या आणि उस्तादची स्टेशनवर भांडणं सुरू असताना झिपऱ्याच्या धक्क्याने उस्ताद ट्रेन खाली येतो. उस्तादच्या निधनानंतर सगळी मुले झिपऱ्यालाच उस्ताद मानू लागतात. या मुलांच्या आयुष्यात पुढे काय होते याचे चित्रण.

सामायिक करा :

झिपऱ्या - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती