सविता दामोदर परांजपे
२०१८


११९ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ८/६/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१९५/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :जे. ए. इंटरटेंटमेंट प्रा. लि. अँड पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत
निर्माता :जॉन अब्राहम
दिग्दर्शक :स्वप्ना वाघमारे-जोशी
पटकथा :शिरीष लाटकर
संवाद :शिरीष लाटकर
संगीत :अमितराज
छायालेखन :प्रसाद भेंडे
संकलक :क्षितिजा खंडागळे
गीतलेखन :वैभव जोशी, मंदार चोळकर
रंगभूषा :विनोद सरोदे
वेषभूषा :मालविका बजाज
ध्वनि :प्रमाण पानसरे
कलाकार :सुबोध भावे,तृप्ती मधुकर तोरडमल,पल्लवी पाटील,राकेश बापट,अंगद म्हसकर,सविता प्रभुणे, हेमांगी कवी - धुमाळ,जॉन अब्राहम,राकेश वैशिष्ठ
पार्श्वगायक :स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू अरोरा, निशा, आदर्श शिंदे
गीते :१) तुझा सखोल स्पर्श हवासा २) श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ३) किती सावरावा तोल - डोह मनाचा खोल खोल ४) किती जन्म हा चालावा लपाछपीचा चाळा
कथासूत्र :शरद अभ्यंकर आणि कुसूम हे सुखी जोडपे. पण कुसूम सतत आजारी पडत असते. अनेक उपचारांनी देखील तिची तब्येत बरी होत नसते. त्यामुळे शरद ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचे ठरवतो आणि अशोकला घरी बोलावतो. कुसूमला पाहाताच क्षणी तिला कोणीतरी झपाटले असल्याचे अशोकच्या लक्षात येते. तिचा हात बघत असताना तू कोण आहेस असे तो तिला विचारतो, यावर मी सविता दामोदर परांजपे असल्याचे ती सांगते. कुसूमच्या शरीरात सविताचा वास अनेक वर्षांपासून असतो. पण याची कल्पना कोणालाच नसते. पण अशोक घरात आल्यानंतर कुसूमच्या अंगात असलेली सविता सगळ्यांना सतवायला सुरू करते. तिच्या मागण्या अशोकपुढे ठेवते. तिचा शोध घेण्याची ही कथा.
विशेष :याच नावाच्या ८० च्या दशकातल्या गाजलेल्या नाटकावर आधारित.

सामायिक करा :

सविता दामोदर परांजपे - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती