कंडिशन्स अप्लाय-अटी लागू
२०१७

कौटुंबिक
११३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १३/६/२०१७ क्र.- डीआयएल २/३५/२०१७ दर्जा – यूए

निर्मिती संस्था :संस्कृती सिनेव्हिजन प्रॉडक्शन्स
निर्माता :डॉ. संदेश म्हात्रे
दिग्दर्शक :गिरीश मोहिते
कथा :संजय पवार
पटकथा :संजय पवार
संवाद :संजय पवार
संगीत :अविनाश-विश्वजीत
छायालेखन :कृष्णा सोरेन
संकलक :निलेश गावंड
गीतलेखन :विश्वजीत जोशी, संगीता बर्वे, जय अत्रे, ओमकार कुलकर्णी
कला :गिरीश कोलपकर
रंगभूषा :प्रकाश विचारे
वेषभूषा :प्रिया वैद्य
प्रसिद्धी संकल्पना :गणेश गारगोटे
कलाकार :सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, रेवती लिमये, मिलिंद फाटक, आतिशा नाईक, उत्कर्षा बिर्जे, राजन ताम्हाणे, विनीत शर्मा
पार्श्वगायक :रोहित राऊत, फरहाद भिवंडीवाला, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी, विश्वजीत जोशी, आनंद शिंदे, गंधार कदम
गीते :१) काही कळेना २) तुझेच भास ३) मै तो हारी ४) मार फाट्यावर
कथासूत्र :स्वरा ही एक रेडिओ जॉकी आहे. तिचे तरुण वय आणि तिचे कार्यक्षेत्र पाहता त्यासाठी लागणारा बिनधास्तपणा तिच्यात तेवढाच मुरलेला आहे. तर दुसरीकडे अभय हा मोटारी बनवणाऱ्या प्रख्यात कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. या दोघांमधली सामायिकता म्हणजे, त्यांना लग्न नको असते. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि ही 'रिलेशनशिप' पुढे जाऊन 'वर्क आउट' होते. बरीच वळणे आणि आडवळणे घेत कथा विशिष्ट अशा शेवटावर येऊन ठेपते.

सामायिक करा :

अधिक माहिती