चि. व चि. सौ. कां.
२०१७

विनोदी
१३३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ११/५/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/६/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :झी स्टुडिओज
निर्माता :निखिल साने
दिग्दर्शक :परेश मोकाशी
कथा :परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी
पटकथा :परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी
संवाद :परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी
संगीत :नरेंद्र भिडे
छायालेखन :सुधीर पलसाने
संकलक :अभिजीत देशपांडे
गीतलेखन :परेश मोकाशी
कला :सिद्धार्थ तातूस्कर
कलाकार :ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, भारत गणेशपुरे, पुष्कर लोणारकर, शर्मिष्ठा राऊत, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, आरती मोरे, सुनील अभ्यंकर, पौर्णिमा तळवलकर, सतीश आळेकर
पार्श्वगायक :स्वप्नील बांदोडकर,श्रेया घोशाल,स्वानंद किरकिरे
गीते :१) मन हे २) चि. व चि सौ.का
कथासूत्र :ग्रुपमधल्या एकमेकांच्या आत्यंतिक प्रेमात असलेल्या जोडप्याचं लग्न, लग्नानंतर काही दिवसांतच तुटलेलं असतं. त्यामुळे सावित्री आणि सत्यवान लग्नाआधीच एकत्र राहून बघण्याचा निर्णय घेतात. आत्यंतिक प्राणिप्रेमी असलेली, रिक्षावाला शाकाहारी आहे की मांसाहारी ते विचारुनच रिक्षात बसणारी सावित्री; आत्यंतिक पर्यावरणप्रेमी असलेल्या, म्हणजे पाणी वाचवण्यासाठी एकच शर्ट आलटून-पालटून चारवेळा घालणाऱ्या, अगदी सूर्याचीही ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्यवानाच्या घरी राहायला जाते आणि मग धमाल उडते.

सामायिक करा :

अधिक माहिती