बॉईज-२
२०१८

सामाजिक
१४१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ३/१०/२०१८ क्र.- डीआयएल/३/११६/२०१८ दर्जा- ए

निर्मिती संस्था :सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा.लि.
निर्माता :संजय छाब्रिया, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे
दिग्दर्शक :विशाल सखाराम देवरुखकर
कथा :हृषिकेश कोळी
पटकथा :हृषिकेश कोळी
संवाद :हृषिकेश कोळी
पार्श्वसंगीत :सुनील सिंग
छायालेखन :सिद्धार्थ जाटला
संकलक :गुरुनाथ पाटील
गीतलेखन :अवधूत गुप्ते, मंदार चोळकर, हृषिकेश कोळी
कला :सतिष गवळी
रंगभूषा :दिवाकर कदम
वेषभूषा :सायली सोमण
नृत्य दिगदर्शक :राहुल संजीव
साहसदृश्ये :अजय ठाकूर
पब्लिसिटी डिझाईन :लोकी स्टुडीओ
ध्वनि :शंतनू अकेरकर, दिनेश उचील
कलाकार :सुमंत शिंदे,पार्थ भालेराव,प्रतीक लाड, गिरीश कुलकर्णी, सायली पाटील,पल्लवी पाटील, ओंकार भोजने, सोहम काळोखे, यतीन कार्येकर, शुभांगी तांबळे, अक्षता पाडगावकर, अमित्रियान पाटील,रोहित चव्हाण, जयवंत वाडकर, शर्वरी जेमिनीस, अजित शिंधये
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, रोहित राऊत, मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिवने, प्रसंजीत कोसंबी, जुईली जोगळेकर, अवधूत गुप्ते
गीते :१)गोटी सोडा बाटली फोडा २) तोड फोड तोड फोड आज तोड फोड ३) येना शोना येना ४) घाल घाल घाल ५) दोस्ता राख जरा लाज ऎक आतला आवाज
कथासूत्र :ढुंग्या, धैर्या आणि कबीर हे तिघे मित्र बारावीत असून त्यांचे नऱ्या या सिनिअर सोबत चांगलेच वाकडे आहे. त्याच्या सोबत सतत ढुंग्या आणि धैर्या यांची भांडणे होत असतात. या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी कबीर बारावीच्या वर्षात हॉस्टेलला न राहायचे ठरवतो. पण कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या चित्राच्या तो प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो होस्टेलला राहायला येतो. पण कबीर, ढुंग्या आणि धैर्या यांचे नऱ्या सोबतचे वाद सुरूच असतात. त्यात या सगळ्यांमध्ये एक पैज लागते. ही पैज पूर्ण करू न शकणाऱ्याला कॉलेज सोडून जावे लागेल असे ठरते. आता ही पैज काय आहे, या पैजेचा या मुलांच्या आयुष्यवर काय परिणाम होतो या घटनांमधून चित्रपट उलगडत जातो.

सामायिक करा :

अधिक माहिती