सवाल माझा ऐका
१९६४

तमाशापट
३५ मिमी/कृष्णधवल/११०मि./प्रमाणपत्र क्र. बी ४२७२५/७-१०-१९६४./यू

निर्मिती संस्था :चेतना चित्र
निर्माता :अनंत माने
दिग्दर्शक :अनंत माने
कथा :रणजित देसाई
पटकथा :रणजित देसाई
संवाद :रणजित देसाई
संगीत :वसंत पवार
छायालेखन :ई. महंमद
संकलक :गंगाराम माथफोड
गीतलेखन :जगदिश खेबूडकर
कला :बळीराम बीडकर
रंगभूषा :रामचंद्र यादव
वेषभूषा :दिनकर जाधव
नृत्य दिगदर्शक :रंजन साळवी, बाळासाहेब गोखले, कु. माया जाधव
स्थिरचित्रण :पी. विनोद राय
गीत मुद्रण :बी.एन.शर्मा
रसायन :रॅमनॉर्ड रिसर्च लॅबोरेटरीज
ध्वनि :बाबा लिंगनुरकर
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
कलाकार :अंजनी, अरुण सरनाईक, इंदिरा चिटणीस, उरुणकर, उषा चव्हाण, के. गोविंद, गणपत पाटील, जयश्री गडकर, दादा साळवी, पंडित विधाते, बर्चीबहाद्दर, माया जाधव, मेघमाला, वसंत शिंदे, विभूते, विश्वनाथ, शांता तांबे
पार्श्वगायक :बालकराम, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण
गीते :१) आधी नमूजी गणनायका, २) अशी डंफावर थाप मारूनी, ३) हाती एकतारी होऊनी भिकारी, ४) छुमक छुम नाचे नाचे, ५) कसं काय पाटील बर हाय का? ६) पावसात उभी जलपरी, ७) आम्ही इंद्राच्या घरच्या, ८) तरुणपणाच्या रस्त्यावरचं सोळावं वरीस धोक्याचं, ९) कुणी चुरडिल फुल गुलाबी, १०) अग अबला म्हणती तुला साजणी, ११) आज होळी पुनवेला झुंबड उठली
कथासूत्र :ज्योतिबा महागावकर आणि राघू इटकर.दोन प्रतिस्पर्धी तमाशाचे मालक.एकदा जत्रेत यांची सवाल जवाबांची झुंबड लागते.अट होती की,हरेल त्यानं लुगडं नेसायचं.ज्योतिबा हरला आणि अट त्याला मान्य करावी लागली.त्याची बायको या धक्क्यानं मरण पावली.त्याची मुलगी छोटी अनु हिला तिची आत्या आपल्या गावी घेऊन गेली.पुढल्या वर्षी ज्योतिबा पुन्हा राघू इटकराला आव्हान देतो.पण हृदयाचा झटका येऊन तो लवकरच मरण पावतो.त्याची मुलगी याचा वचपा काढायचं ठरवते.ज्योतिबाच्या गुरूकडून ती नाचगाण्याचं शिक्षण घेते.जयवंताला आपला शाहीर म्हणून निवडते.जयवंता हा राघूचाच मुलगा असतो.तरी तो अनुला साथ द्यायला तयार होतो.बोर्डावर राघू त्याला बोलतो पण काही उपयोग होत नाही.सवाल असा विचारला जातो : विजय श्रेष्ठ की पराजय श्रेष्ठ ?

सामायिक करा :

अधिक माहिती