पुढारी
१९७२

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी ७१३०१/७-१२-१९७२./यू

निर्मिती संस्था :वैभव सहकार चित्र
निर्माता :विष्णुपंत शिंदे, नामदेवराव दगडे, विनोद शेलार
दिग्दर्शक :केशव तोरो
कथा :अमृत गोरे
पटकथा :केशव तोरो, अमृत गोरे
संवाद :उदय कुमार शाळगांवकर
संगीत :राम कदम
छायालेखन :एस. गोकुळ
संकलक :दत्ताराम तावडे
गीतलेखन :जगदीश खेबुडकर, मा. दा. देवकाते
कला :बळीराम बीडकर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर, भास्कर टक्के
वेषभूषा :दिनकर पी.जाधव
नृत्य दिगदर्शक :चेतन कुमार
स्थिरचित्रण :विश्वास आव्हाड
गीत मुद्रण :बी.एन.शर्मा
ध्वनिमुद्रक :बाबा लिंगनूरकर, शरद चव्हाण
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही.रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :शांताकिरण नियंत्रीत शालिनी सिनेटोन,कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी मुंबई
कलाकार :सुलोचना, चंद्रकांत, निळू फुले, गणपत पाटील, विवेक, के.घोरपडे, बर्ची बहाद्दर, सरला येवलेकर, मा.पवन खेबुडकर, माणिकराज, लीलागांधी, उषा चव्हाण
पार्श्वगायक :आशा भोसले, उषा मंगेशकर, राम कदम, जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, वाणी जयराम, पुष्पा पागधरे, अपर्णा मयेकर, छोटा गंधर्व
गीते :१) जनी जनार्दन म्होरं बसला रोकून आपल्या नजरा हो, २) अगबाई बाई बाई चोरी झाली गं अहो फौजदारसाहेब लवकर लिवा लवकर लिवा अहो माझी नोदवून घ्या तक्रार, ३) बाजीराव नाना हो बाजीराव नाना, ४) जगी पैशाला भाव होतो रंकाचा राव, ५) ही दुनिया आतनं काळी वरन पांढरी
कथासूत्र :संपत्ती आणि सत्ता यांचा मोह संतालादेखील सैतान बनवू शकतो.तमाशाच्या पार्श्वभूमीवरील कथा.एका खेडेगावातील सज्जन पाटील या अभिलाषेपायी खूप नीच पातळीवर जातो.त्या उलट त्याची पत्नी.नवरा रास्त मार्गापासून ढळला आहे,हे पाहिल्यावर ती वाघिणीचं रूप धारण करते.अनेक अडचणींना तोंड देते.पण शेवटी आपल्या नवऱ्याला वठणीवर आणते.त्याला त्याच्या पापाचं प्रायश्चित्त मिळतं.तो पश्चातापदग्ध होतो.

सामायिक करा :

पुढारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती