मानिनी
१९६१

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/९७मि./प्रमाणपत्र क्र. बी३३१३२/३-८-१९६१./यू

निर्मिती संस्था :कला चित्र
निर्माता :डी. जे. नायक, ई. महंमद
दिग्दर्शक :अनंत माने
कथा :पं. महादेवशास्त्री जोशी
पटकथा :व्यंकटेश माडगूळकर
संवाद :व्यंकटेश माडगूळकर
संगीत :वसंत पवार
छायालेखन :व्ही. बारगीर
संकलक :गंगाराम माथफोड
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी
कला :म. द. ठाकुर, (जी.डी.आर्ट)
रंगभूषा :राम यादव
केशभूषा :चौबे
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, (बॉम्बे सांउड सर्व्हिस आर. सी. ए.)
ध्वनि :वसंतराव निकम
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
रसायन शाळा :प्रकाश सिने लॅबोरेटरी, कोल्हापूर
कलाकार :अप्पा जोशी, अमोल किणीकर, इंदिरा चिटणीस, चंद्रकांत गोखले, जयश्री गडकर, जोग, दादा साळवी, नीलम, बेबी कल्पना, माला दीक्षित, रत्नमाला, रमेश देव, राजन, वसंत शिंदे, शरद तळवळकर, शांता तांबे, हंसा वाडकर
पार्श्वगायक :आशा भोसले, वसंत पवार, विठ्ठल शिंदे, सुमन कल्याणपूर
गीते :१) अरे खोप्यामधी खोपा, २) वनवास हा सुखाचा, ३) अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ४) मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, ५) धरितीच्या कुशीमधी बीय बीयाणं नीजली, ६) हस्ति सर्व संपदा, ७) मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
कथासूत्र :दोघांच्या परिस्थितीत मोठी तफावत असूनही मालती माधवशी लग्न करते.तिचे मातापिता तिला विचारेनासे होतात.संसाराचा गाडा रेटताना ती मेटाकुटीस येते.काही काळाने तिला थोडे बरे दिवस येतात.एकदा तिचे आईबाप तिचा संसार बघायला येतात. अण्णासाहेब तिचा संसार बघून हेटाळणी करतात व आपल्याबरोबर चल असा आग्रह करतात.पण मानी मालती तो सल्ला धुडकावून लावते.मालतीच्या बहिणीचे लग्न ठरते.मालती-माधवला आमंत्रण असते.ते दोघे जातात,पण त्यांचा पावलोपावली अपमान तर होतोच;शिवाय त्यांच्यावर चोरीचा आळ घेण्यापर्यंत मजल जाते. अतिशय दुःखी अंतःकरणाने ते दोघे घर सोडतात, पुन्हा कधीही न येण्यासाठी!दुसऱ्या बहिणीचे लग्न ठरते, बोलावणे येते,पण ते जात नाहीत.गरीब मालती शेवटपर्यंत ताठ मानेने जगते.
विशेष :बहिणाबाईची गाणी चित्रपटात सर्वप्रथम संगीतबद्ध करण्यात आली, ‘सांगत्ये ऐका’ हा यशस्वी तमाशापट दिग्दर्शित करणारे अनंत माने यांनी तितकाच यशस्वी कौटुंबिक चित्रपट करून दाखविला, दोन्ही चित्रांची पटकथा व्यंकटेश माडगूळकर यांचीच होती

सामायिक करा :

अधिक माहिती