लाखाची गोष्ट
१९५२

विनोदी
३५मिमी/कृष्णधवल/१९०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. बी ६८१९/७-१०-१९५२./यू

निर्मिती संस्था :गजराज चित्र, पुणे
निर्माता :राजा परांजपे
दिग्दर्शक :राजा परांजपे
कथा :ग.दि.माडगूळकर, ग.रा. कामत
पटकथा :ग.दि.माडगूळकर, ग.रा. कामत
संवाद :ग.दि.माडगूळकर, ग.रा. कामत
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :बाळ बापट
संकलक :राजा ठाकूर
गीतलेखन :ग.दि. माडगूळकर
कला :केशव महाजनी
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :दिनकर जाधव
स्थिरचित्रण :बा.स.लोंढे
गीत मुद्रण :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रक :रुबेन मोझेस
निर्मिती स्थळ :डेक्कन स्टुडिओज्, पुणे
कलाकार :चित्रा, रेखा, राजा गोसावी, क-हाडकर, इंदिरा चिटणीस, रविंद्र, शरद तळवळकर, ग.दि. माडगूळकर, राजा परांजपे, मदन मोहन
पार्श्वगायक :आशा भोसले, मालती पाण्डे, सुधीर फडके
गीते :१) सांग तू माझा होशिल कां, २) त्या तिथे पलिकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे, ३) डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, ४) पहिले भांडण केले कोणी, ५) लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही, ६) ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत
कथासूत्र :दोघे मित्र.एक कवी तर दुसरा चित्रकार.दोघांचीही आर्थिक परिस्थिती बिकट.कवीची आकाशवाणीवर गाणारी मैत्रीण दयाळू तर चित्रकाराची मैत्रीण एका लक्षाधीशाची मुलगी.एकमेकांवर दोघेही अनुरक्त झालेले.लक्षाधीश मुलीचा पिता एका अटीवर लग्नाला मान्यता देतो की त्याने एका महिन्यात लाख रुपये संपवून दाखवले पाहिजेत.होतं उलटंच.या दोघांनाही नुकसानीसाठी खर्चिलेले पैसे धनलाभच देऊन जातात.दोघंही पैसे कसे संपवायचे म्हणून रडकुंडीला येतात.धमाल उडते.शेवटी सर्व मनासारखं होतं.

सामायिक करा :

अधिक माहिती