झेल्या
२०१५

सामाजिक
९० मिनिटे, ३१/८/२०१५, क्रमांक - डीआयएल /१/१२७/२०१५, दर्जा - यू

निर्मिती संस्था :वक्रतुंड मो. पिक्चर्स
निर्माता :महादेव गावडे
दिग्दर्शक :कृष्णा कांबळे
कथा :संतोष फिरंगे
पटकथा :युवराज पाटील
संवाद :युवराज पाटील
संगीत :शशांक पोवार
पार्श्वसंगीत :शशांक पोवार
छायालेखन :अब्दुल वहाब
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्व मोतीवाले
गीतलेखन :युवराज पाटील
कला :अमर मोरे
रंगभूषा :संतोष गायकी
वेषभूषा :शामराव कांबळे
ध्वनिमुद्रक :उमर मल्लाणी
चित्रीकरण :पडवलवाडी, कोगे बहिरेश्वर फुलेवाडी
कलाकार :मकरंद अनासपुरे, छाया कदम, शशांक झेंडे, संतोष शिंदे, स्नेहल माने, स्नेहल बिरांजे, मल्हार दंडगे
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, भारती
गीते :१) आला सुर्व्या डोंगरात,बाग सरून गेली रात , २) आरं इच्या भनं,देवाला बी लागतंय रस्सा मटण
कथासूत्र :झेल्या शाळेत शिकतोय. तो उत्तम फुटबॉल प्लेयरसुद्धा आहे. त्यामुळेच मोरबाळे गुरुजींचा तो लाडका आहे. फुटबॉल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून येणार झेल्या खेळताना मात्र दुसऱ्याचे बूट वापरतो. शाळेला जाताना पायात घालायला त्याला चप्पलही मिळत नाही. बापाकडे तो नेहमी चप्पलसाठी हट्ट करतो. परिस्थितीच्या चक्रव्युहामध्ये अडकलेला शंकर त्याला दररोज चप्पल आणण्याचे वचन देतो. पण त्याला ते जमत नाही. शंकर आणि सावजाला एकच चिंता सतावतेय ती म्हणजे वयात आलेल्या मुलीच्या मंजीच्या लग्नाची. त्यामुळेच दररोज बाजारात जाणारा शंकर मुलीसाठी पावडर लिपस्टिक आणतो, मुलाची मागणी उपेक्षितच रहाते. अशा परिस्थितीत झेल्याला शाळा सोडून कुलकर्ण्यांच्या म्हशी चारायचं काम पत्करावं लागत. त्याचं फुटबॉलपटू व्हायचं स्वप्न पुसट होत जातं. झेल्याच्या आयुष्याची पुढे होणारी फरफट चित्रपटात आहे.

सामायिक करा :

अधिक माहिती