हा खेळ सावल्यांचा
१९७६

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१०६मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८१५९३/२१-५-१९७६./यू

निर्मिती संस्था :मधु मुव्हीज
निर्माता :सुमति गुप्ते
दिग्दर्शक :वसंत जोगळेकर
कथा :सुमति गुप्ते
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :हृदयनाथ मंगेशकर
छायालेखन :मनोहर आचार्य
संकलक :वसंत बोरकर
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :सुधीर गायकवाड
रंगभूषा :पंढरी जुकर
केशभूषा :मीना वेंगुर्लेकर
वेषभूषा :अकबर कॉजस मेन्स वेअर
नृत्य दिगदर्शक :नायडू, माधव किशन
स्थिरचित्रण :कामत फोटोफ्लॅश
गीत मुद्रण :कौशिक, रॅबिन चॅटर्जी, शशांक लालचंद
रसायन :फेमस सिने लॅबोरेटरीज
ध्वनि :मिनू बाबा
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
कलाकार :अशोक कुमार, आशा काळे, चंद्रकांत खोत, जयराम कुलकर्णी, डॉ. काशिनाथ घाणेकर, देवेन वर्मा, धुमाळ, मधू आपटे, मधू जोगळेकर, मूकूंद गोसावी, राजा गोसावी, लालन सारंग, विजया वर्मा, शीला वालावलकर, श्रीकांत मोघे, संगीता घोले, संजीवनी बिडकर, सुमति गुप्ते
पार्श्वगायक :आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कुमार, महेंद्रकपूर, अनुराधा पौडवाल
गीते :१) आला आला वारा संगे पावसाच्या धारा, २) काजळ रातीनं ओढून नेला, सये साजण माझा, ३) गोमू संगतीन माझ्या तू येशील कां, ४) रात्रीस खेळे चाले हा गूढ चांदण्याचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा.
कथासूत्र :जमीनदाराची एकुलती एक मुलगी इंदुमती.तिच्या हट्टी स्वभावामुळे त्यांचा नोकर नरसू याला मृत्यू आला हा विचार तिला अलीकडे फारच अस्वस्थ करीत होता. त्या नरसूच्या पिशाच्चाची बंगल्याला बाधा आहे असं सर्वांना वाटत असतं.पुढे जमीनदाराला मृत्यू येतो. त्यानंतर इंदुमतीची सावत्र आई तिच्या भावाच्या मदतीने एका नाट्य कलावंताकडून नरसूची प्रतिकृती तयार करून घेते.इंदुमती आणखीच भयभीत होते.ती बावरल्यासारखी वागू लागते.तिला वेडपट ठरवतात.तिचा वाग्दत्त वर शेखर याला सारं प्रकरण समजतं. इंदूला पिशाच्चानं झपाटलं नाही हे तो दाखवून देतो आणि त्या दोघांचं कुटील कारस्थान उघडकीला येतं.

सामायिक करा :

अधिक माहिती