अपराध
१९६९

कौटुंबिक
३५ मिमी/कृष्णधवल/११० मि./प्रमाणपत्र क्र. बी ५८०३१/१२-८-१९६९./यू

निर्मिती संस्था :मनोरम फिल्म्स (राम दादालानी प्रॉडक्शन)
निर्माता :शरद पिळगांवकर
दिग्दर्शक :राजदत्त
कथा :चंद्रकांत काकोडकर, शरद पिळगांवकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :एन दत्ता
छायालेखन :दत्ता गोर्ले
संकलक :पांडुरंग खोचीकर
गीतलेखन :मधुसूदन कालेलकर
कला :टि. के. देसाई
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :रामभाऊ शिंदे
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनि :मनोहरचाश्रीपत
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही
निर्मिती स्थळ :मेहबुब स्टुडिओ, आशा स्टुडिओ स्टर्लिंग स्टुडिओ, मुंबई
रसायन शाळा :बॉम्बे लेबोरेटरीज्
कलाकार :इंद्राणी मुखर्जी, चिमासाहेब घोरपडे, बाळ कोल्हटकर, मुरलीधर वालतुरे, रमेश देव, राजा परांजपे, लता थत्ते, विठ्ठल पेडणेकर, विमल घैसास, विवेक, सीमा देव
पार्श्वगायक :आशा भोसले, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर
गीते :१) सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला २) स्वप्नांत पाहिले जे ते रुप हेच होते ३) असेच जुळले गीत सुरात अशीच जुळते साथ, ४) सूर तेच छेडिता गीत उमटले नवे, ५) तुझी प्रीत आज कशी स्मरू
कथासूत्र :श्याम दाते हा एक नभोवाणी गायक.त्याच्या आजारपणात नर्स वसुधा त्याची शुश्रूषा करते आणि वसुधा व शाम कायमचे प्रेमबंधनात अडकतात.पण संसाराच्या वसुधाच्या कल्पना म्हणजे मोठा एअरकंडिशन्ड फ्लॅट,फ्रीज,गाडी वगैरे वगैरे..!त्यामुळे प्राप्त परिस्थितीत तरी लग्न करता येत नाही.पुढे वसुधा एका श्रीमंत पण काही दिवसांचीच सोबती असलेल्या आसावरीला कंपॅनिअन म्हणून जाते.तो आसावरीची आणि श्यामची गाठ घालून देते.ती श्यामला सांगते की, श्यामने आसावरीशी लग्न करायचे. ती मृत्यूच्या दारात असल्याने तिची सर्व संपत्ती श्यामला मिळेल व वसुधाला त्याच्याशी लग्न करता येईल.श्यामच्या गाण्यावर खुश झालेली आसावरी श्यामच्या मागणीला होकार देते व त्या दोघांचं लग्न होतं.पण लग्नानंतर आसावरीची तब्येत सुधारते.

सामायिक करा :

अधिक माहिती