वीणा जामकर “रमाई”च्या भूमिकेत

गंभीर अभिनयासाठी ओळखली गेलेली वीणा जामकर बाळ बरगाले दिग्दर्शित “रमाई” या चित्रपटात शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. याबाबत ती विशेष उत्सुक आहे. ही भूमिका साकारण्यासाठी वीणा जामकर हिने रमाबाई आंबेडकर यांच्या चरित्राचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चरित्र तिने वाचले होतेच. “रमाई “साकारताना या वाचन, मनन, चिंतन याचा बराच उपयोग झाला अशीच वीणा जामकरची भावना आहे. यापूर्वी वीणा जामकरने “तुकाराम ” या चित्रपटात रखमा ही व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या अभिनयाने वीणा जामकरने नेहमीच दाद मिळवली आहे.