विजयाची लग्नें
१९३६

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३९७८ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १५९४१/२०-३-३६

निर्मिती संस्था :ललित कलादर्श
दिग्दर्शक :मामा वरेरकर
कथा :मामा वरेरकर
पटकथा :मामा वरेरकर
संवाद :मामा वरेरकर
संगीत :बापूराव पेंढारकर
छायालेखन :वसंत जगताप
संकलक :वामन फडके
ध्वनिमुद्रक :बरजोरजी टाटा
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :मुंबई
रसायन शाळा :लक्ष्मीटोन लॅबोरेटरी, मुंबई
कलाकार :बापूराव पेंढारकर, दाजीबा परब, भीमराव काळे, अंतोबा कुलकर्णी, पिंगळे, मास्टर छोटू (बालनट), हंसा वाडकर, केसर वाडकर, नलिनी नागपूरकर
गीते :१) हृदयात बसे ती नयनीं दिसे, २) हसती किती फुलल्या कलिका, ३) सविता नभान्ती गेला, ४) बरसात बरसती है, ५) दैया छलकी जाय, ६) बाजे मोरी पायलिया, ७) नैनसों नैन मिला, ८) या बाव-या मनाला, ९) किती खटपट लावी, १०) आज लाडलीकी बनी जो, ११) सुंदर सारी भूमी नाचे, १२) मोहुनिया विजया.
कथासूत्र :लक्षाधीश बापाने आपले चिरंजीव विजय यांच्याकरिता एक श्रीमंत मुलगी जवळजवळ निश्चित केली होती.परंतु काव्यात आणि संगीतात भराऱ्या मारणाऱ्या विजयाच्या हृदयावर आघात केला तो एका प्रोफेसरच्या मुलीने.ती मुलगीही गायनप्रेमी.त्यामुळं दोघांच्या तारा एका सुरात वाजू लागल्या.सनातनी बाप आणि मत्सरी चुलतभाऊ यांनी मुलीला बदचालीची ठरविण्याचा घाट घातला.पण डाव उधळला गेला आणि विजय व अरुणाचा विवाह निर्विघ्नपणे पार पडला.
विशेष :या चित्रपटातील एकूण बारा गाण्यांतील पांच गाणी हिन्दी भाषेत होती. मामा वरेरकर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला बोलपट विजयाची लग्ने मराठीबरोबर हिन्दीतही ‘‘शादी का मामला’’ उर्फ ‘‘सुनहरी जमना’’ म्हणून काढण्यांत आला होता.

सामायिक करा :

विजयाची लग्नें - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती