वंदे मातरम्
१९४८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ३९६२३/ ११-९-१९४८

निर्मिती संस्था :नवा झंकार चित्र
दिग्दर्शक :राम गबाले
कथा :ग. दि. माडगूळकर
पटकथा :ग. दि. माडगूळकर
संवाद :ग. दि. माडगूळकर
संगीत :सुधीर फडके
संकलक :राजा ठाकूर
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :सदाशिवराव गायकवाड
ध्वनिमुद्रक :वसंतराव निकम
ध्वनिमुद्रिका :एच् .एम्. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
कलाकार :पु. ल. देशपांडे, सुनिता देशपांडे, राम उपाध्याय, मामा फणसळकर, यशवंत निकम, गुलाब वटमोरीकर, अनंत धुमाळ, छाया हरोलीकर, गणपत पाटील
गीते :१) ऐका ग पाठी एक भाऊ, २) ऊठ सावळ्या गोविंदा रे, ३) छुन्नक छुन्नक वाजत होते, ४) एक मुजरा तिरंगी झेंड्याला, ५) एक भाबडी मैनाराणी, ६) जीवांचा करून कान ऐका वर्तमान, ७) अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी, ८) एक पाय तुमच्या गावांत दुसरा तुरूंगात, ९) झडल्या भेरी झडतो डंका, १०) वेद मंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्
कथासूत्र :महाराष्ट्रातल्या शिराळी तहसिलातल्या सोनसळी या खेड्यातील स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतलेल्या आणि अज्ञात राहिलेल्या एका कुटुंबाची ही कथा आहे.ज्या दिवशी त्यांनी हा समर्पणाचा निर्णय घेतला तो भाऊबीजेचा दिवस होता.दिवाळीच्या वेळीच त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं.या गोष्टीत तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत.एक भाऊ शेतकरी,दुसरा विद्यार्थी आणि तिसरा उनाड;जो देशकार्यासाठी प्राणाचं बलिदान करून हुतात्मा झाला.

सामायिक करा :

वंदे मातरम् - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती