निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :बापूराव केतकर
छायालेखन :डी.जी.गुणे
गीतलेखन :भालजी पेंढारकर
गीत मुद्रण :दादासाहेब तोरणे
ध्वनिमुद्रक :दादासाहेब तोरणे
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :शाहू मोडक, शांता आपटे, बंडोपंत सोहोनी, मिस् हीरा, बापूराव केतकर, सँडो, बाबूराव आपटे
गीते :१) हे श्याम धीरा, २) उदयाचलि सविता उदेला, ३) भयदा केवि सुजनां, ४) मोहन जरा थांब, ५) पडली प्वारं हितं, ६) भावे वरिता गोसेवेला, ७) कान्हा रूसवा ना धरी रे, ८) कांही शंकिता वाया, ९) परब्रह्म परमेश्वर, १०) हे भूप कंस नरेश्वर, ११) मन घेईना सार्वभौमा, १२) प्रेम प्रेम एक मज देई, १३) प्रखर चिंतानली दाहने, १४) भाग्य हे कुलांगने, १५) हीनभावा मनीं न आणा, १६) प्राणसखये थोर बाले, १७) झणी ये मोहन श्याम, १८) का लोटिसी कन्हैया, १९) चला गाई चाराय्.
कथासूत्र :श्यामसुंदर कृष्णाच्या आयुष्यावरील चित्रपट.पेंद्या,रत्नया,विठया हे कृष्णाचे बालपणीचे खास मित्र. कृष्णासह हे व इतर मित्र गोपींची छेड काढणे,त्यांना वाटेत अडवून लोणी पळवणे,दुधाच्या घागरी फोडणे वगैरे खोड्या काढत असत.अशा अनेक खोडकर बाललीला,राधा कृष्णाचे प्रेम यासारख्या अनेक घटना या चित्रपटात आहेत.
विशेष :भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान मिळवणारा चित्रपट. मुंबईच्या न्यू वेस्टेंड (नाझ) सिनेमा गृहातून तो सलगपणे २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. श्यामसुंदर हा भारतातील पहिलाच बाल चित्रपट. श्यामसुंदरच्या मराठी आवृत्तीबरोबरच हिन्दी आणि बंगाली भाषेतील आवृत्याही काढण्यात आल्या होत्या. पुण्यांत निर्माण झालेला हा पहिलाच बोलपट. या रौप्यमहोत्सवी चित्रांत प्रथम ‘कंसवध’ दृश्य नव्हते. ते ४ आठवड्यानंतर घालण्यात आले. नंतरच श्यामसुंदर अधिक गर्दी खेचू लागला.