शककर्ता शिवाजी
१९३४

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४८७३ फूट/१३५ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३६६१/२५-७-३४

निर्मिती संस्था :श्री जयदेवी सिनेटोन कंपनी
दिग्दर्शक :नागेंद्र मुझुमदार
कथा :वाय.एन्.(अप्पा)टिपणीस
छायालेखन :वाय.डी.सरपोतदार
ध्वनिमुद्रक :मिनू कात्रक
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :माधव काळे, मुझुमदार, आठवले, मधुकर गुप्ते, बी.आपटे, मा. अमृतलाल, मा.उमेश, गोहर कर्नाटकी, इन्दिरा वाडकर
गीते :१) कलियुगी कल्की अवतार, २) करुणा कशी ना तुला, ३) रायगडी आला राजा, ४) ये नभाला चारुता, ५) कारे तुजला दया ना जादुगारा, ६) पतित तू पावना, ७) सुरललना वना आली, ८) पाडस राजस करि याला, ९) तोचि साजिरा नवरा, १०) जनि आकांत हा चालला, ११) विमल हा चंद्र नभाल
कथासूत्र :शिवाजी महाराजांनी म्लेंच्छांच्या कचाट्यातून मायभूची मुक्तता केली,या घटनेवरील चित्रपट.महाराजांच्या कर्तृत्वामुळे आदिलशाही जेरीला आली,कुतुबशाही शरण आली,दिल्लीची मोगलशाही हादरली आणि सिद्दीची सद्दी ओसरली. 'हर हर महादेव'च्या घोषात महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा उभा केला,त्याची कथा.
विशेष :‘‘आमचे इमान’’ या मराठी नाटकावर हा बोलपट आधारलेला होता. मराठी बरोबरच ‘‘मेरा ईमान’’ म्हणून हिन्दी आवृत्ती काढण्यांत आली होती. गोहर कर्नाटकीचे मराठी बोलपटातील प्रथम काम.

सामायिक करा :

शककर्ता शिवाजी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती