सीता स्वयंवर
१९४८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ३९७०५/२४-९-१९४८

निर्मिती संस्था :श्री विजय पिक्चर्स
दिग्दर्शक :ए. आर. शेख
कथा :ग. दि. माडगूळकर
पटकथा :ग. दि. माडगूळकर
संवाद :ग. दि. माडगूळकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :मनोहर कुलकर्णी
संकलक :जे. एफ्. चाऊस
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :बी.डी.थत्ते, एस.जी.जोशी
नृत्य दिगदर्शक :बद्रीप्रसाद
ध्वनिमुद्रक :एम्. ए. काझी
निर्मिती स्थळ :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :दुर्गा खोटे, अनंत मराठे, बेबी शकुंतला, वसंत ठेंगडी, बेबी थाटे, बालकराम, सुलोचना, निंबाळकर, बेबी नसीमन, गणपतराव, बेबी चव्हाण, केळकर, उषा मराठे (उषा किरण) टाकळकर, लीला गडकर, बापू वाटवे, राजकिशोर, मांजरेकर, भागवत, मानाजीराव
गीते :१) मी तुझ्या कांतीचे वल्कल ल्याले, २) पैंजण पायी माझ्या रुणझुण बोले रे, ३) ओटी भरा चांदण्यात, ४) अंगाई रामराया, ५) एक गुपित सांगते तुला, ६) हे वदन तुझे की कमलनिळे, ७) मनोरथा चल त्या नगरीला, ८) मंगल वाद्ये झडती गाती, ९) कमला मीलन झाले राम राज्य होणार
कथासूत्र :पद्माक्षाची कन्या वेदवती ही विष्णुभक्त होती आणि तिला त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा होती.सत्तांध रावण तिला विष्णूचं नाव घ्यायचं नाही आणि माझ्याशी लग्न कर असा आदेश देतो.ती अदृश्य होते आणि आकाशवाणी ऐकू येते की,पुढील जन्मी ती विष्णूची पत्नी होऊन रावणाचा सूड उगवेल.जनकाच्या पोटी ती जन्म घेईल.सीता स्वयंवरात राम शिवधनुष्याला दोरी लावण्याचा पण पुरा करतो आणि जनककन्या सीतेशी विवाहबद्ध होतो.शेवटी रावण रामाकडून मारला जातो आणि शापवाणी खरी होते.
विशेष :चित्रपटाची हिन्दी आवृत्ती ही प्रदर्शित करण्यांत आली होती

सामायिक करा :

सीता स्वयंवर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती