प्रतिभा
१९३७

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/१११७३ फूट/१२५ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १७७७१/२१-५-३७

निर्मिती संस्था :शालिनी सिनेटोन
दिग्दर्शक :बाबूराव पेंटर
कथा :ना.ह.आपटे
संवाद :ना.ह.आपटे
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :के. व्ही. माचवे
संकलक :एम्.कांबळे
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :गणपतराव वडणगेकर
रसायन :के. प्रभाकर
ध्वनिमुद्रक :जी.एल्.काळे
ध्वनिमुद्रिका :रूबी रेकॉर्डस् कंपनी, मुंबई यांनी ओडियन लेबलवर ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :के. प्रभाकर
कलाकार :दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, केशवराव दाते, हिरा, वैशंपायन, मा. श्याम, विष्णूपंत औंधकर, राजा परांजपे, विष्णूपंत जोग, जयशंकर दानवे, व्ही.बी.दाते, हिराबाई बडोदेकर
गीते :१) सखि आज कन्हैया, २) कनक कमलांवरी, ३) उडती बागडती मनोहर, ४) अंबरी रम्य उषा आली, ५) विलासिनी बाला शुंभागी, ६) हस र्‍या गोजि र्‍या लतिका, ७) उषा हांसे कपोलीं लाली, ८) विधी तनये शारदे कामदे, ९) आज सुमंगल होत घरोघरी, १०) सुमन हें वाहिले.
कथासूत्र :कुशाग्र बुद्धीच्या प्रसाद या कवीची पत्नी प्रतिभा त्याचे स्फूर्तिस्थान असते.प्रसाद गर्दीपासून सदैव दूर राहणारा.राजकवि एकदा सहलीसाठी गेला असता तो प्रसादची काव्यरचना ऐकतो आणि राजदरबारी काव्य ऐकवण्याचा प्रसादला आग्रह करतो.प्रतिभा त्याला विरोध करते.पण प्रसाद तयार होतो.प्रसाद राजकन्येच्या वाढदिवसानिमित्त खास गीतरचना करतो.राजकवि ते आपले काव्य म्हणून दरबाराला ऐकवतो व वाहवा मिळवतो.प्रसाद ही रचना आपली आहे हे पटविण्याचा प्रयत्न करतो.पण त्याच्या व प्रतिभाच्या नशिबी तुरुंगवास येतो.प्रतिभाला सौम्य शिक्षा द्यावी म्हणून प्रयत्न केला जातो.प्रतिभा आपली कैफियत जोरदारपणे मांडते.
विशेष :‘हृदयाची श्रीमंती’ या कादंबरीवरून हा चित्रपट काढला होता. हिन्दी आवृत्ती ही प्रदर्शित करण्यात आली.

सामायिक करा :

प्रतिभा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती