नीला
१९३५

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/१०१६५ फूट/१०१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १४७३३/१५-६-३५

निर्मिती संस्था :वीणा पिक्चर्स
निर्माता :बाबूराव खांडेकर
दिग्दर्शक :बाबूराव खांडेकर
कथा :अनंत काणेकर
पटकथा :अनंत काणेकर
संवाद :अनंत काणेकर
संगीत :प्रो. बी. आर. देवधर
छायालेखन :गोवर्धनभाई पटेल, हंसराज पटेल
गीतलेखन :अनंत काणेकर
ध्वनिमुद्रक :वाय्. एस्. कोठारे, खंडूभाई देसाई
कलाकार :रेखा काणेकर, रोशनआरा, मंगला रानडे, मा. जनार्दन, पाटकर, सुर्वे, दीक्षित, नागांवकर, मोघे, अभ्यंकर
गीते :१) चार दिनांची दुनिया, २) वाहत मधु मंद वात, ३) वाटे प्रिय सुंदरता, ४) मान भावि सखया, ५) करि मुदित सविता, ६) हरि प्रणय देहभान, ७) मनी घुमत मूक साद, ८) चैन न जीवा, ९) तनु तुझी गं, १०) न्यारी रीती प्रेमाची, ११)हा आशा कर.
कथासूत्र :शबल नावाच्या विश्वासघातकी धाकट्या भावामुळे मोतीद्वीपचा राजा कालभद्र हा कुप्रसिद्ध चाच्यांकडून मारला जातो आणि शबल राज्य बळकावतो.मृत राजाची एकुलती एक कन्या नीला लवकरच खास विश्वासातील माणसे गोळा करते आणि यथावकाश आपले राज्य शबलकडून हस्तगत करते.

सामायिक करा :

नीला - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती