निर्मिती संस्था :मिनर्व्हा चित
निर्माता :सोहबराव मोदी
दिग्दर्शक :बाबूराव आपटे
कथा :म.भा.भू.जगन्नाथ, रघुनाथ आजगांवकर
पटकथा :बाबूराव आपटे
संवाद :बाबूराव आपटे
संगीत :सदाशिवराव नेवरेकर
छायालेखन :य.दा.सरपोतदार
संकलक :वसंत बोरकर
कला :रूसी.के.बँकर
गीत मुद्रण :मिनर्व्हा मुव्हीटोन, मुंबई
ध्वनिमुद्रक :एम्. एदलजी
ध्वनिमुद्रिका :दि. नॅशनल ग्रामोफोन रेकॉर्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. मुंबई यांनी यंग इंडिया लेबलवर ध्वनीमुद्रित केल्या होत्या
निर्मिती स्थळ :मुंबई
रसायन शाळा :मिनर्व्हा मुव्हीटोन, मुंबई
सूत्रधार :अनंत हरि गद्रे
कलाकार :विसूभाऊ भडकमकर, सोनबा पवने, बळवंत परचुरे, देशदास रानडे, बी. पवार, दत्तोपंत आंग्रे, काळे, शंकरराव गोलतकर, गंगूबाई, कृष्णाबाई हुकेरी, सरस्वतीबाई माने, यमुनाबाई, कुसुम देशपांडे, शालिनीबाई, मल्लापूरकर
गीते :१) लागो मना छंद, २) आम्ही विठोबाचे दूत, ३) पतित पावन नाम ऐकुनी, ४) नामाचा महिमा नेणोचिं, ५) ये ग येग विठाबाई, ६) नाम फुकट चोखट, ७) मन लाजे कां साजे, ८) कां लावितसा माया, ९) सुंदर माझे जाते, १०) कां गा न येसी विठ्ठला, ११) विठ्ठल माऊली, कृपेची साऊली, १२) माय मेली बाप मेला, १३) माझीया जननी हरिणी, १४) काय माझा आता पाहतोसी अंत, १५) अवघाची संसार सुखाचा करीन, १६) रामकृष्ण माळ घाली, १७) हरिनामाचा गजर करा हो, १८) गाई विठ्ठलाचे नामा, १९) विष्णुसी भजला शिव दुरावला, २०) सद्गुरू सारिखा सोयरा, २१) डोळुले शिणले पहातां वाटुली २२) आकल्प आयुष्य व्हावे.
कथासूत्र :संत नामदेवांचं आपल्या कापड विक्रीच्या धंद्याकडे दुर्लक्ष असतं.त्यापेक्षा पंढरीच्या विठोबाच्या दर्शनात आणि चिंतनातच ते दंग असतात.त्यांची भक्त जनाबाई हिच्यावर विठ्ठलाचे दागिने चोरल्याचा आरोप येतो आणि तिला देहांताची शिक्षा फर्मावली जाते.पण प्रत्यक्ष पांडुरंग तिची सुटका करतो.परीसा भागवत हाही एक विठ्ठलाचा आवडता भक्त.पण त्याचा अहंकार गेलेला नसतो.त्याच्यात समतेची जाणीव तितकीशी नसते.नामदेव आपली भक्ती व कीर्तने यामार्गे जसे अनेकांना योग्य मार्ग दाखवतात,तद्वत परीसलाही मार्गावर आणतात.
विशेष :चित्रपट व्यवसायात सूत्रधार ही संज्ञा या चित्रपटामध्ये पहिल्यांदा वापरण्यात आली.